गणिततज्ञ डॉ. दिलीप देशमुख यांना रणपिसे क्लासेसच्या RCMPL स्पर्धेचे कौतुक…

ROHA TIMES

गणिततज्ञ डॉ. दिलीप देशमुख यांना रणपिसे क्लासेसच्या RCMPL स्पर्धेचे कौतुक…

उतेखोल/माणगांव ( रविंद्र कुवेसकर )रणपिसे क्लासेस तर्फे विद्यार्थी आणि पालक यांना विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी ‘ वेध भविष्याचा, मार्ग यशाचा हा कार्यक्रम शुक्रवार दि. १९ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय गणित तज्ञ डॉ. दिलीप देशमुख यांनी पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. दिलीप देशमुख यांनी आपल्या जीवनातील अनुभव विद्यार्थ्यांना आणि पालकांना सांगितले आणि कशा प्रकारे भविष्यात चांगल्या संधी आपण योग्य पद्धतीने अभ्यास करत तयार करू शकतो याबाबत माहिती दिली.
यावेळी रणपिसे क्लासेस ने स्वतःच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘RCMPL (रणपिसे क्लासेस मॅथ्स प्रिमीअर लीग )’ या आगळ्या वेगळ्या गणिताच्या खेळाचा नमुना कार्यक्रमात दिला. काही पालकांना प्रश्न पडायचा की गणिताचा हा खेळ क्लासमध्ये घेतात तरी कसा आणि आहे तरी काय? यासाठी सुरवातीस पालकांसाठी प्रदर्शित करण्यात आलेल्या या खेळामध्ये विद्यार्थ्यांची झटपट उत्तर देण्याची पद्धत, पाठांतर, कौशल्य, समयसूचकता, कमालीचा आत्मविश्वास पाहून पालकांना आनंद झाला. मोबाईलच्या विळख्यात सापडणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे वळवणारी ही स्पर्धा डॉ. देशमुख यांनी समाधान व्यक्त केले. १० वी आणि ११ वी च्या विद्यार्थ्यांना हरवत १९ गुणांनी विजय संपादित केला. या सामन्याच्या मॅन ऑफ द मॅच फिनिशर १० वीचा विद्यार्थी कुमार कृष्णाला डॉ. एम एस निकम यांच्या हस्ते गौरविण्यात आले. रणपिसे क्लासेसच्या RCMPL ला  रणपिसे क्लासेसच्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय गणित तज्ञ डॉ. दिलीप देशमुख यांनी सल्यूट करत आपल्या भावना व्यक्त केल्या.
माणगांव मधील कुणबी भवन येथे घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात प्रमुख वक्ते गणित तज्ञ डॉ. दिलीप देशमूख तर प्रमुख पाहुणे डॉ. एम.एस. निकम, रायगड भूषण ॲड. परेश जाधव व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी पालक उप

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close