लाल मातीतला खेळाडू हा देशपातळीवरील संघात खेळला पाहिजे:- माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते…..

ROHA TIMES

लाल मातीतला खेळाडू हा देशपातळीवरील संघात खेळला पाहिजे:- माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते…..

कोलाड (श्याम लोखंडे ) लाल मातील खरा मर्दानी खेळ म्हणजे कब्बडी खेळ मराठी माणसाने नेहमी आक्रमक राहिले पाहिजे.कबड्डी हा खेळ जिवंत ठेवायचे असेल तर जिव ओतून खेळा, जिव झोकून देऊन खेळा तरच माझ्या लाल मातीतला खेळाडू माझ्या देशाच्या संघात देशपातळीवर खेळेल असे प्रतिपादन माजी केंद्रीय अनंत गिते यांनी आंबेवाडी जिल्हापरिषद मतदार संघातील भगवा चषक कबड्डी स्पर्धेच्या उदघाट्न प्रसंगी व्यक्त केले.
रोहा तालुक्यातील आंबेवाडी जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून 1 मे रोजी जिल्हा स्तरीय भगवा कब्बडी चषकाचे उदघाटन माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.मोठ्या उत्साही वातावरणात कब्बडी खेळाडूंना मार्गदर्शन करतांना ते पुढे म्हणाले कि कब्बडी खेळ हा रोजगाराचा साधन आहे आपल्या  मातीतला खेळ असून हळू हळू या खेळाला मोठं मोठे उद्योजक व सिने शेलिब्रेटी उपस्थित राहिले जात आहेत.त्यामुळे हा खेळ आशिया स्थरासह अनेक देश हा खेळ खेळू लागले आहेत यामुळे हा खेळ ऑलम्पिक मध्ये ही खेळला जाईल असे चित्र उभे राहिले आहे.परंतु हा खेळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेल्या नंतर तो राष्ट्रीय संघात राहतो कि काय? अशी परिस्थिती निर्माण आहे आता हरियाणा, पंजाब,कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू या सर्व राज्यातील खेळाडू या संघात येऊ लागल्याने महाराष्ट्रातील कबड्डी खेळातील खेळाडू मागे पडत आहेत.आपण त्या जिद्दीने खेळले पाहिजे.या खेळात पहिल्या आशियन चॅनपियनशिप मध्ये सुवर्ण पदक मिळवले होते व त्यांचे कर्णधार कोकणातील अशोक यांनी केले होते. मी चंद्रकांत लोखंडे आणि त्यांची टीम यांना धन्यवाद देईल की त्यांनी आयोजित केलेल्या अशा स्पर्धेतून अधिक खेळाडू निर्माण होतील की जेणेकरून त्यांना पुढील खेळासाठी संधी मिलेले यावेळी आ. रविशेठ पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले कि खरे म्हणजे कबड्डी हा खेळ लोकप्रिय खेळ आहे. अशा प्रकारे कबड्डीचे आयोजन करून हे खेळाडू जिल्ह्यातून राज्यात, राज्यातून देशात असे निवडले जाऊन ते खेळतात आशा शब्दात त्यांनी उपस्थित खेळाडूंना प्रोत्साहित केले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते,आ.रविशेठ पाटील,आ. भरतशेठ गोगावले,आ.महेंद्र दळवी, अमित घाग,अनिल नवगणे रायगड जिल्हा प्रमुख,रमेश सुतार, रोहा तालुका प्रमुख समिर शेडगे, उप तालुका प्रमुख चंद्रकांत लोखंडे, राजेंद्र राऊत, अमरजी तेलंगे, कुलदीप सुतार, ज्ञानेश्वर खांमकर, मिलिंद पवार जेष्ठ नेते शंकरराव म्हसकर, शिवराम महाबळे, सरपंच समिर महाबळे, विष्णु मोरे,चेतनाताई लोखंडे ,मनोहर महाबळे,ज्ञानेश्वर सुतार,अजय बाकाडे, गणेश शिंदे,आबा शिंदे,रमेश सानप, बबन म्हसकर, खांडेकर सर शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व आदी खेळाडू व रसिक प्रेषक बहुसंख्येने उपस्थित होते.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close