
रसायनी पाताळगंगा रोटरी व रोटरॅक्टर कलबच्यावतीने अॅमेटी विद्यापीठात रक्तदान शिबिर…..

रसायनी पाताळगंगा रोटरी व रोटरॅक्टर कलबच्यावतीने अॅमेटी विद्यापीठात रक्तदान शिबिर…..
रसायनी(राकेश खराडे)भाताण येथील अॅमेटी विद्यापीठात रोटरी क्लब ऑफ पाताळगंगा,रोटरॅक्टर क्लब पाताळगंगा,अॅमेटी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.या शिबिरात ५२० विद्यार्थी व विद्यापीठ स्टाफचे ब्लड चेकअप रजिस्ट्रेशन झाले.यात विद्यार्थ्यांकडून रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून २२१ ब्लड बॅग रक्तदान कलेक्ट झाल्या. अमेटी विद्यापीठाचे व रोटरॅक्ट क्लब पाताळगंगाचे उत्कृष्ठ नियोजन ऐसी हाॅलमध्ये शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले.शिबिराच्या उद्घाटनाला अॅमेटी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.ए.डब्लू.संतोषकुमार, अॅमेटी काॅलेजचे विद्यार्थी, काउन्सिलचे प्रमुख डॉ.गौतम गवळी,रोटरी क्लब पाताळगंगाचे अध्यक्ष रो.गणेश काळे, सेक्रेटरी संदिप साबळे, रोटरॅक्ट क्लब अध्यक्ष रोहन गावडे, सेक्रेटरी समृद्ध उचिल, अॅमेटी विद्यापीठ विद्यार्थी काउंन्सिलचे अध्यक्ष अभिषेक करीसिद्धीमठ, सेक्रेटरी रिद्धी मुनोथ व रोटरी क्लब पाताळगंगाचे सभासद रो.शारदा काळे, रो. उमाताई मुंढे, रो.ऋतूजा भोसले, रो.वर्षा पाटील, रो.मेघा कोरडे, अॅनेट तनिष्का, रो.बाळकृष्ण होनावळे,रो.डाॅ.मिलींद भगत,रो. दिपक चौधरी, रो. देवेंद्र,रो.गणेश वर्तक, रो.सुनिल कुरुप, रो.अमित शहा, रो. विजय पाटील, रो. आदी उपस्थित होते.रोटरी ब्लड बॅंक न्यू पनवेल व तेरणा हाॅस्पिटल ब्लडबॅंक न्यू पनवेल व त्यांच्या स्टाफने योग्यरित्या शिबिराची जबाबदारी स्वीकारली.शिबिराची सुरवात रो. होनावळे सरांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करुन केली व आभार प्रदर्शन सर्व मान्यवर व ब्लडबॅंकेच्या कर्मचा-यांचे- डॉक्टर्सचे आभार मानून शिबिराची सांगता झाली.