अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या नराधम वॉचमनला जन्मठेप…… 

ROHA TIMES

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या नराधम वॉचमनला जन्मठेप……
पनवेल(संजय कदम)पनवेल येथील सदाशिव बिल्डींग मधील एका मॅडमकडे घरकाम आहे असे सांगुन नोंदवही दाखविण्याचा बहाणा करून फिर्यादीस बोलण्यामध्ये गुंतवुन ठेवून तिची दिशाभुल करून फिर्यादीचे सोबत असणारी तिची अल्पवयीन मुलगी वय वर्षे 5, हिस बिल्डींग मधील वॉचमन रूम मध्ये नेवून तिच्यावर दोन नराधामांनी आळीपाळीने लैगिक अत्याचार केले आणि सदर बाबत तिने कोणास सांगु नये या करीता तिला मारहाण करून दमदाटी केली या बाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता. सदर खटल्यामध्ये पनवेल येथील सत्र न्यायालयाने आरोपीस जन्मठेप आणि रक्कम रू. 50,000/- ( अक्षरी रक्कम रू. पन्नास हजार मात्र) दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
पनवेल शहरातील पाच वर्षीय पिडीत मुलगी तिचे आईसोबत सदाशिव बिल्डींग, टिळक रोड, पनवेल या बिल्डींग समोरून जात असताना सदर बिल्डींगचे वॉचमन शिवमढी पांडे आणि श्रीकांत पांडे यांनी पिडीतेचे आईला बिल्डींगचे गेटचे आत बोलावून घेतले आणि बिल्डींग मधील एका मॅडमकडे घरकाम आहे असे सांगुन नोंदवही दाखविण्याचा बहाणा करून फिर्यादीस बोलण्यामध्ये गुंतवुन ठेवून तिची दिशाभुल करून फिर्यादीचे सोबत असणारी तिची अल्पवयीन मुलगी वय वर्षे 5, हिस बिल्डींग मधील वॉचमन रूममध्ये नेवून तिच्यावर दोन नराधामांनी आळीपाळीने त्या लहान बालिकेवर लैंगिक अत्याचार केले आणि सदर बाबत तिने कोणास सांगु नये या करीता तिला मारहाण करून दमदाटी केली. त्यानंतर पिडीतेने सदरचा प्रकार आईला सांगितला आणि त्यानुसार पनवेल शहर पोलीस ठाणे येथे फिर्याद नोंद झाली आणि वॉचमन शिवमढी पांडे व श्रीकांत पांडे यांचेवर गुन्हा दाखल झाला. पनवेल शहर पोलीस ठाणे यांनी सदर गुन्हयाचा तपास पुर्ण करून दोन्ही आरोपींविरूध्द दोषारोपपत्र मा. सत्र न्यायालयात दाखल केले. सदर खटल्याची सुनावणी अति. सह जिल्हा व अति सह सत्र न्यायाधीश, पनवेल, श्रीमती शाइदा शेख यांचे न्यायालयात झाली. याप्रकरणात पिडीत मुलगी, तिची आई, पंच आणि तपासिक अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली. सदर दोन आरोपींपैकी वॉचमन श्रीकांत पांडे याचा तुरूंगातच मृत्यु झाला होता. सदर खटल्यामध्ये अति शासकीय अभियोक्ता, अ‍ॅड. प्रतिक्षा वडे – वारंगे यांनी अभियोग पक्षातर्फे काम पाहीले.
सदर केसच्या सुनावणी दरम्यान पैरवी अधिकारी विद्या भगत, वरिष्ठ पोलीस निरिक्षक विजय कादबाने यांनी सहकार्य केले. सरकार पक्षातर्फेे अति शासकीय अभियोक्ता, अ‍ॅड. प्रतिक्षा वडे – वारंगे यांनी मा. न्यायालयासमोर केलेला युक्तीवाद आणि दाखल केलेले न्यायनिर्णय ग्राहय धरून न्यायालयाने आरोपी वॉचमन शिवमढी पांडे, वय. 25 वर्षे यास भा.द.वि. कलम 376 ड, 323, 506 तसेच पोक्सो कलम कायदा 3,4,5 (जी), 6 अन्वये जन्म ठेपेची व 50 हजार रूपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. सदर दंडाच्या रक्कमेपैकी रक्कम रूपये 25,000/- (रक्कम रूपये पंचवीस हजार मात्र) पिडीत मुलीस देण्यास मा. न्यायालयाने आदेश दिलेले आहेत. सदर खटल्याच्या निकालाकडे पनवेल परिसरातील लोकांचे लक्ष लागून राहीलेले होते. मा. न्यायालयाने आरोपीला दिलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेमुळे यापुढे लहान मुलांवर अत्याचार करणार्‍या निच प्रवृत्तीच्या लोकांना चांगलीच जरब बसलेली आहे. या न्यायनिर्णयामुळे समाजातील सर्व स्तरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close