
रोह्यातील पाच ग्रामपंच्यायतीच्या विजयी सरपंच, सदस्यांचा सुनिल तटकरे यांच्या हस्ते सत्कार…..

रोह्यातील पाच ग्रामपंच्यायतीच्या विजयी सरपंच, सदस्यांचा सुनिल तटकरे यांच्या हस्ते सत्कार…..
रोहा(समीर बामुगडे) रोहा तालुक्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंच्यायत निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाने निर्विवाद वर्चस्व स्थापन करित रोहयात आजही, व यापुढही आम्हीच हे निवडणुकीत सिध्द करुन दाखवले. गीता बाग या ठिकानी निवडून आलेल्या थेट सरपंच व सदस्यांचा भव्य सत्कार सोहळा खासदार सुनिल तटकरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या वेळी जिल्हाध्यक्ष मधुकर पाटिल व महिला जिल्हाध्यक्षा उमाताई मुंडे उपस्तीत होत्या. रोहा तालुक्यात पुई, पहुर, तळवली तर्फे अष्टमी, दापोली, खैरा खुर्द. अशा पाच ग्रामपंच्यायतिच्या निवडणूका या निवडणुक कालावधी संपल्याने घेण्यात आल्या होत्या. यामधे सरपंच पदाची थेट निवडणूक असल्याने निवडणूका अटीतटीच्या व चुरशीच्या होतिल असा अंदाज होता. त्यातच बदललेले सरकार, राजकिय घडामोडी यामुळे देखील रोह्यात अपेक्षित बदल होईल असे चित्र निर्मान करंन्यात आले होते.मात्र राजकारणातील चिवटपणा सोडतील मग ते तटकरे कसले, म्हणत माजी पालकमंत्री आदितीताई तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवदिंपक्षाने ग्रामपंच्यायत निवडनुकीत यश संपादन केले आहे.
पुई ग्रामपंच्यायतीत रुशाली संजय मांडलुस्कर तर तळवली ग्रामपंच्यायतीत रविंद्र रामचंद्र मरवडे हे भरघोस मतांनी निवडून आले.
सत्तेच्या माध्यमातून गावचा विकास व पाचही वर्ष जनतेच्या संपर्कात रहाणे हेच राष्ट्रवादीच्या यशाचे गमक असल्याचे बोलले जात आहे. रोहा तालुक्यात पेण, अलीबाग मतदार संघाचा भाग येत असला तरी या ठिकानी शिंदे सरकार चे आमदार असो वा भाजप, शेकाप चे आमदार असो रोह्यात कुणाचीच जादू चालली नसल्याचे निवडणुकीत दिसले उलट 15 वर्ष शेकापच्या ताब्यात असलेली दापोली ग्रामपंच्यायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फ़डकला व त्या ठिकानी बाळाराम रामा मोरे हे राष्ट्रवादीकडून निवडून आले. त्यामूळे महाविकास आघाडीत असलेल्या शेकाप चे सध्या राष्ट्रवादी शी पटेनासे झाले आहे. त्यामूळे ते सुनिल तटकरेंवर टिका करित आहेत. की यापुढे रायगड चा खासदार शेकाप ठरविणार हे वक्तव्य हास्यापद असल्याचे बोलले जात आहे तरी राष्ट्रवादी ला मिळत असलेला जनाधार पाहात सुनिल तटकरें यांचा बलाढ्य राष्ट्रवादी पक्षच रायगडच्या राजकारणाची दिशा ठरविणार असल्याचे बोलले जात आहे.