खोपोली पोलिसांनी आरोपीच्या आवळल्या मुसक्या ! ८०,००० /- रूपये किंमतीच्या आयफोन मोबाईलसह चोरटयाला पोलीसांनी केले ६ तासात जेरबंद……

ROHA TIMES

खोपोली पोलिसांनी आरोपीच्या आवळल्या मुसक्या !
८०,००० /- रूपये किंमतीच्या आयफोन मोबाईलसह चोरटयाला पोलीसांनी केले ६ तासात जेरबंद……

नरेश जाधव / कर्जत रायगड जिल्हयातील खोपोली पोलीस ठाणे येथील बाजारपेठ परीसरात व आजुबाजुचे लोकवस्ती, कंपनी परिसरात काही दिवसापासून दिवसा व रात्री घरफोडी, चोरीचे गुन्हयांचे प्रमाण वाढल्याने पोलीस अधिक्षक, रायगड सोमनाथ घार्गे अप्पर पोलीस अधिक्षक, रायगड अतुल झेंडे यांनी गुन्हे उघडकीस आणणे व मालमत्तेच्या गुन्हयांवर प्रतिबंध करणेबाबत सुचना देवुन आदेशीत केले होते.

त्याअनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकरी खालापुर संजय शुक्ला यांचे सुचनेप्रमाणे खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक राकेश कदम व पोलीस स्टाफ असे विशेष पोलीस पथक नेमुन त्यांनी दि.०९ जानेवारी २०२३ रोजी घडलेल्या चोरीच्या घटनेच्या ठिकाणचे सी.सी.टी.व्ही फुटेज संकलीत करुन त्याआधारे गुन्हा उघडकीस आणण्याचे प्रयत्न चालू असतांना सी.सी.टी.व्ही फुटेज व तांत्रीक दृष्टया शोध घेत असतांना तक्रारदार यांचे हॉटेल रजनिकांत येथे हॉटेलमध्ये काम करणारा कामगार पाहीजे आरोपीत बालाजी नामदेवराव नपते, वय ४२ वर्षे, मुळ रा. मु.पो. वारला, ता. जि. वाशिम, राज्य – महाराष्ट्र याचा तांत्रीक विश्लेषणाचे आधारे आरोपीचे सीसीटीव्ही फुटेजमधील वर्णनाप्रमाणे शोध घेवून त्यास मौजे शिळफाटा येथून ताब्यात घेवून पोलिसी खाक्या दाखवत अधिक व सखोल चौकशीकरीता खोपोली पोलीस ठाण्यात आणुन त्याचेकडे खोपोली पोलीस ठाणे,येथे गु. रजि. नं. ०४/२०२३, भा.द.वि.सं.कलम ३८९ या गुन्हयासंदर्भात अधिक व सखोल चौकशी केली असता, त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यावेळी नमुद आरोपीत याची अंगझडती घेतली असता त्याचे अंगातील फिकट खाकी व मातीने मळलेल्या पॅन्टचे पुढील बाजुस असलेल्या डाव्या खिशात १ आयफोन कंपनीचा मोबाईल व उजव्या खिशात १ जीओ कंपनीचा मोबाईल असे ८०,५००/- रूपये किंमीतीचे २ मोबाईल मिळून आले असुन गुन्हयाचा पुढील तपास पो.ना. / २२७८ भालेराव हे करीत आहेत. नमुद आरोपीत याचे विरूद्ध यापुर्वी १ ) अनसिंग पोलीस ठाणे, जि.वाशिम गुरजि.नं. २२४/२०१९, भा.द.वि.सं. कलम ३३६, ४२७, २) अनसिंग पोलीस ठाणे, जि.वाशिम गु. रजि. नं. ३०१३ / २०१४, मुंबई जुगार अॅक्ट १२ (अ) याप्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

सदरची उत्कृष्ट कामगिरी पोलीस अधिक्षक, रायगड श्री. सोमनाथ घार्गे अप्पर पोलीस अधिक्षक, रायगड श्री. अतुल झेंडे यांचे आदेशाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकरी खालापुर श्री. संजय शुक्ला यांचे सुचनेप्रमाणे खोपोली पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री. शिरीष पवार यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक राकेश कदम, तपासीक अंमलदार पो.ना. / २२७८ भालेराव व पो. हवा. / १०८६ पाटील यांचे विशेष प्रयत्नांतुन केल्याने सदरचा गुन्हा उघडकीस आलेला आहे.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close