
माणगांव तालुका पूर्व विभागात वाघ व बिबट्यांचा मुक्त संचार, नागरिक भयभीत…..

माणगांव तालुका पूर्व विभागात वाघ व बिबट्यांचा मुक्त संचार, नागरिक भयभीत….. 
माणगांव(महेश शेलार) माणगांव तालुका पूर्व विभागात गेली 15 – 20 दिवस वाघ आणि बिबट्या अनेक गावांमध्ये नागरिकांच्या निदर्शनास आला आहे. ढालघर फाटा येथील विंचवळी येथील गावातील नागरिकांनी स्पष्ट बघितले. त्यानंतर होडगाव कोंड येथील काही दुचाकीस्वारांना आढळला तसेच आंब्रेवाडी येथील त्याच गावातील दोन गुरे त्यांनी खाल्ली तसेच रविवार दि.22 जानेवारी 2023 रोजी रात्री 7.30 ते 8.30 च्या दरम्यान माणगांव वरून आंब्रेवाडी याठिकाणी रिक्षा चालक पराग सावंत हे प्रवाशांना सोडण्यास गेले होते. परंतु ते त्या प्रवाशांना सोडून आल्या नंतर आंब्रेवाडी ते पळसगांव बुद्रुक या मधील अंतरामध्ये त्यांनी तो बिबट्या रस्त्याच्या कडेला उभा असलेला पाहिला. त्यानंतर आपली रिक्षा तिथे नं थांबवता घाबरलेल्या अवस्थेत शेजारी असलेल्या पळसगांव बु. या गावी जाऊन तेथील ग्रामस्थांना सतर्क केले.
त्यानंतर तेथील काही प्रतिष्ठित व्यक्तींनी लागलीच तेथील तरुण तसेच रात्री अपरात्री प्रत्येक नागरिकांच्या हाकेला धावणारे व्यक्तिमत्व म्हणजे आंब्रेवाडी येथील पोलीस पाटील राकेश पवार यांना कळविले. त्यांनी ताबडतोब माणगांव तालुका वनक्षेत्र अधिकारी यांना झालेली घटना कळविली. त्यानंतर त्यांनी नागरिकांना काही सूचना दिल्या. नागरीकांना सतर्कतेचा आवाहन करण्यात आले की, आपल्या हद्दीमध्ये 08.55pm च्या सुमारास बिबट्या (वाघ) रिक्षावल्याने पाहिल्याचे वृत्त आहे आपणांस सर्वाना सूचना देण्यात येते कोणीही विनाकारण रात्री अपरात्री घराबाहेर पडू नये. तसेच याबाबत तालुका वनक्षेत्र अधिकारी येथे याबाबत कळविण्यात आले आहे. तालुका वनक्षेत्र अधिकारी तसेच वनपाल यांनी दि.23 जानेवारी 2023 रोजी रात्री 8.30 ते 11 वाजेपर्यंत खबदारी म्हणून या भागात स्वतः भेट दिली. त्यानंतर त्यांनी ग्रामस्थांना काही सूचना दिल्या. गावातील गुरे रात्रीच्यावेळी बाहेर ठेऊ नये. गुरे यांना शोधणारी माणसे यांनी सोबत 3 – 4 माणसे सोबत घेऊन फिरावे. रानात फिरत असताना घोळक्याने राहावे. सोबत मोबाईल असल्यास गाणी चालू ठेवावे. रानात एकट्याने प्रवास करणे टाळावे. गावात सकाळी व सायंकाळी स्पीकर वर शक्य असल्यास गाणी लावावित जेणेकरून लोकवस्ती आहे हे कळेल. रात्रीचा प्रवास टाळावा. आपली सुरक्षा हेच आपले ध्येय असून सर्वांनी काळजी घ्यावी. रात्र ही वैऱ्याची आहे हे पाहून पुढचे पाऊल उचला आपणच आपल्या कुटुंबाचे संरक्षण करू शकतो असे सांगण्यात आले.