तरुणाने प्रामाणिकपणे सापडलेला मोबाईल केला पोलिसांच्या हवाले…….
तरुणाने प्रामाणिकपणे सापडलेला मोबाईल केला पोलिसांच्या हवाले…….
पनवेल(विशष प्रतिनिधी): डोंबीवली येथे राहणाऱ्या एका तरुणाला सॅमसंग कंपनीचा मोबाईल सापडला होता. त्यातरुणाने सदर मोबाईल पोलिसांकडे सुपूर्द करत प्रामाणिकपणाचे दर्शन घडवले.
राहुल हृदयनाथ कांबळे असे या तरुणाचे नाव असून त्याला एक सॅमसंग कंपनीचा A 23 मॉडेलचा आणि 30,000 रुपये किंमतीचा मोबाईल सापडला होता. त्याने तो मोबाईल पोलीस ठाण्यात हजर केला. त्यावेळी सपोनी तारळे व पथकाने मोबाईल मालकाचा तांत्रिक तपासाच्या आधारे शोध घेऊन मोबाईलचे मालक संतोष रविकांत परब यांना पोलीस ठाण्यात बोलावून घेऊन मोबाईलची ओळख पटवून मानपाडा पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या हस्ते त्यांना परत दिला.