भाजप संलग्न छत्रपती शिवाजी महाराज कामगार सेना आणि शिवम आय केअरच्यावतीने आयोजित नेत्र तपासणी शिबिराला नागरिकांचा प्रतिसाद…… 

ROHA TIMES

भाजप संलग्न छत्रपती शिवाजी महाराज कामगार सेना आणि शिवम आय केअरच्यावतीने आयोजित नेत्र तपासणी शिबिराला नागरिकांचा प्रतिसाद……
पनवेल(विशेष प्रतिनिधी): भारतीय जनता पार्टी सोबत संलग्न असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कामगार सेना आणि शिवम आय केअरच्यावतीने मोफत आणि परिपूर्ण नेत्र तपासणी शिबिर नेरुळ येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा नागरिकांनी उत्तम प्रतिसाद लाभला.
या वेळी डोळ्यांच्या अत्याधुनिक तपासणी सह मोतीबिंदू ऑपरेशन फक्त अकरा हजार शंभर रुपयात करून देण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन संघटनेच्या राष्ट्रीय सल्लागार ऍडव्होकेट मंगलताई घरत आणि राष्ट्रीय अध्यक्ष संजय पवार यांच्या माध्यमातून करण्यात आले असून या शिबिराला माजी खासदार संजीव नाईक यांच्यासह भाजपचे महाराष्ट्र सरचिटणीस संजय केनेकर , कामगार मोर्चा अध्यक्ष गणेश ताठे, माजी महापौर सागर नाईक, भाजप नेते संजय उपाध्याय, भाजप नेत्या वर्षाताई भोसले , मा नगरसेवक रवींद्र इथापे, गणेश भगत, जयवंत तांडेल, सुहासिनी नायडू, छायाताई काटकर , रणजीत नाईक, वैशालीताई गीते , अंजनीताई सैनी यांनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले आणि आयोजकांना शुभेच्छा दिल्या.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close