डॉ.सी.डी.देशमुख महाविद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती उत्साहात संपन्न….. 

ROHA TIMES

डॉ.सी.डी.देशमुख महाविद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती उत्साहात संपन्न…..
रोहा(नारायण खुळे)रोहे येथील कोकण एज्युकेशन सोसायटीचे डॉ.चिंतामणराव देशमुख वाणिज्य व सौ.कुसुमताई ताम्हाणे कला महाविद्यालय, इतिहास विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती कार्यक्रम महाविद्यालयाच्या सभागृहात अत्यंत उत्साहात संपन्न संपन्न झाला.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी व उदघाटक म्हणुन या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अतुल साळुंके हे उपस्थित होते.तसेच या कार्यक्रमास महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख प्रा.तुळशिदास मोकल, अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.शत्रुघ्न लोहकरे,भूगोल विभाग प्रमुख डॉ. अनिल शिंदे,डॉ.सम्राट जाधव, प्रा. सीमा भोसले, प्रा.अनंत थोरात, प्रा. शिल्पा खाडे व प्रा .वैशाली कानावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या जयंती कार्यक्रमाची सुरुवात या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अतुल साळुंके यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून केली.
या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा. तुळशिदास मोकल यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती पराक्रम दिवस म्हणुन का साजरी केला जाते याची माहिती सांगत नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केलेल्या पराक्रमाची माहिती उपस्थितांना सांगितली.
या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अतुल साळुंके यांनी उपस्थिताना प्रबोधीत करतांना असे सांगितले की नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला नवे वळण देणारे एक महान नेतृत्व होते.ते भारतीय इतिहासातील एक युगपुरुष होते.
त्यांनी आझाद हिंद फौजेच्या माध्यमातून इंग्रजांना धक्का दिला. भारताला स्वतंत्र करण्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती.म्हणुनच त्यांच्या जीवनाचा संघर्षमय प्रवास आणि देश स्वतंत्र करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न ही एक अजरामर गाथा म्हणून ओळखली जाते. सुभाषचंद्र बोस हे तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत होते, आहेत व पुढे भविष्यात राहतील यात यत्किंचितही शंका नाही.
या जयंती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्तविक प्रा.तुळशिदास मोकल यांनी केले तर आभार प्रा.शत्रुघ्न लोहकरे यांनी मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इतिहास विभाग व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी अखंड मेहनत घेतली.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close