हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अष्टविनायक नागरी पथसंस्थेचा विसावा वर्धापनदिन संपन्न……. 

ROHA TIMES

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अष्टविनायक नागरी पथसंस्थेचा विसावा वर्धापनदिन संपन्न…….

रसायनी(राकेश खराडे) हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित 23 जानेवारी 2003 रोजी स्थापन झालेल्या अष्टविनायक नागरी पथसंस्थेचा 20 वा वर्धापनदिन पथसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दिनाकं 23 जानेवारी 2023 संपन्न झाला, या वेळी 2023 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास पथसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार मनोहरशेठ भोईर, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर व शिवधन पतसंस्थेचे अध्यक्ष गणेश म्हात्रे, तालुका संपर्कप्रमुख जे पी म्हात्रे यांनी मार्गदर्शन केले तर पथसंस्थेचे उपाध्यक्ष व शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी द्रोणागिरी शहरप्रमुख जगजीवन भोईर,उपतालुका संघटक के एम घरत, महिला उपजिल्हासंघटिका ममता पाटील, नगरसेविका वर्षा पाठारे, शहर संघटिका मेघा मेस्त्री, संपर्क संघटिका श्रद्धा सावंत,संचालिका वंदना पवार, उपशहर संघटिका रझिया शेख, माधुरी चव्हाण, उपतालुका संघटिका मनीषा ठाकूर, अल्पसंख्याक सेलच्या शहर अध्यक्ष मुमताज भाटकर, तालुका अध्यक्ष हुसेना शेख उपाध्यक्ष रुबिना कुट्टी, सायरा खान,विभाग संघटिका रूपा सिंग, महिला शाखा संघटिका लता राठोड, संगीता लोळगे, रजनी लोळगे, कविता पाटील, कल्पना गराडे, विधानसभा अध्यक्ष एजाज मुकादम, विभागप्रमुख संजय गावंड, विकास कडू,अवजड वाहतूक सेनेचे तालुका अध्यक्ष चेतन म्हात्रे, संपर्क अध्यक्ष धीरज बुंदे, शाखाप्रमुख शैलेश भोईर, नियाज भाटकर, रियाज मुकादम, प्रदीप शेळके, शेखर पडते, दिलीप घरत, इस्माईल शेख, संचालक सुर्यनाथ परदेशी, कर्मचारी दर्शना ठाकूर, नीलम भोईर, जगदीश घरत, चंद्रकांत थळी व पथसंस्थेचे सदस्य व पत्रकार उपस्थित होते.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close