
आर डी सी सी बॅकेचा महिला डिजीटल साक्षरता मेळावा संपन्न…..

आर डी सी सी बॅकेचा महिला डिजीटल साक्षरता मेळावा संपन्न….. 
तळा(किशोर पितळे)रायगड जिल्हा मध्यवर्ती सह.बॅके तळा शाखेचा महिला आर्थीक साक्षरता डिजीटल मेळाव्याचे आयोजन २०जाने.२३ रोजी४वा. तालूक्यातील उसर गावी करण्यात आले होते.यावेळी शाखाव्यवस्थापक प्रमोद प.दळवी यांनी उपस्थीत महीलांना या आधूनिक युगातील बॅकींग सिस्टीम किती जलद गतीने झाली आहे याचे प्रात्यक्षिक दाखवून बॅक व्यवहार स्मार्ट फोन मोबाईलचे माध्यमातून करू शकता.काही महिलांना जर हे करता येत नसेल तर घरातील मुलांकडून शिकून घेतले तर सहज करता येते हल्ली प्रत्येक घरात एक तरी मोबाईल फोन असतोच स्वत: केले तर जास्त अधिक माहीती मिळते परक्या किंवा अनोळखी व्यक्ति कडून करून घेतल्यास आपले बॅक व्यवहार अज्ञानपणाचा फायदा घेऊन फसले जाण्याची भीती जास्त असते. त्यासाठी स्वत: शिकावे.संसारात पुरूषांपेक्षा महीला काटकसर करून पैसे सेव्हिंग अधिक प्रमाणात करीत असतात. या उदात्त भावनेतून सामाजीक जागृकतेच्या माध्यमातून यांचे आयोजन केले असल्याचे सांगून बॅकव्यवहाराची माहिती सेव्हिंग बॅक खाते, महीला बचत गट व्यवसाय वाढीसाठी कर्ज योजना, सर्व प्रकारच्या ठेवी व व्याज दरयांची माहीती दिली यावेळी मदतनीस अविनाश नाक्ती उपस्थीत होते यावेळी विद्यार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थीत होत्या.