उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी म्हणून राज्यस्तरीय पुरस्कारासाठी पनवेल उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके यांची निवड…

ROHA TIMES

उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी म्हणून राज्यस्तरीय पुरस्कारासाठी पनवेल उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके यांची निवड…….

अलिबाग(जिमाका):-मागील वर्षभरात राज्यामध्ये मतदार नोंदणी प्रक्रिया तसेच मतदार जनजागृती अभियानामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अधिकाऱ्यांचा सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात येणार आहे. मुख्य निवडणूक कार्यालयामार्फत निवड केलेल्या उत्कृष्ट काम केलेल्या अधिकाऱ्यांमध्ये पनवेल उपविभागीय अधिकारी श्री.राहुल मुंडके यांचा समावेश आहे. श्री.मुंडके यांची 188-पनवेल या मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयासाठी उत्कृष्ट कामगिरी करणारे मतदार नोंदणी अधिकारी म्हणून राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
राज्यस्तरावर सन्मानासाठी/ पुरस्कारासाठी निवड झालेल्या अधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते दि. 25 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता पाटकर सभागृह, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ, चर्चगेट, मुंबई येथे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देवून सन्मान करण्यात येणार आहे.
विभागीय आयुक्त तथा रायगड जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे तसेच उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती स्नेहा उबाळे आणि इतर सहकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळेच ही निवड झाली असल्याचे सांगून पनवेल उपविभागीय अधिकारी श्री.राहुल मुंडके यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close