मराठी शाळा(दगडी शाळा) तळाचा शैक्षणीक व गुणवत्ता शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांनी उंचावली-मिरा शिगवण……
मराठी शाळा(दगडी शाळा) तळाचा शैक्षणीक व गुणवत्ता शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांनी उंचावली-मिरा शिगवण…… तळा(किशोर पितळे)रायगड जिल्हा परिषदेची प्राथमिक मुलांची शाळा( दगडी शाळा) येथे २१ जानेवारी रोजी संमेलन आयोजन करण्यात आले होते
यावेळी मीराताई शिगवण यांनी स्नेह संमेलन उद्घाटन प्रसंगी मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या कियाशिष्यवृत्ती धारकविद्यार्थ्यानी शैक्षणीक व गुणवत्ता पात्रता उंचावलीअसून तालुक्याचे नांव मोठे केले आहे.पटसंख्या अधिक असून दोन शिक्षकांवर भारपडत होता शिक्षक वाढीसाठी वारंवार मागणी निवेदने द्यावी लागली शिक्षण विभागानेअधिक लक्ष देण्याची गरज आहे.असे मत व्यक्त केले या कार्यक्रमाला नगराध्यक्षा अस्मिता भोरावकर शाळा समिती अध्यक्षा मिराताई शिगवणनगरसेवक तथा उपाध्यक्ष भास्कर गोळे नगरसेवक अविनाश पिसाळ नगरसेविका माधुरीघोलप ग्रीष्मा बामणे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी या शाळे मधून जवाहर नवोदय विद्यालय मंदिर निजामपूर येथे शिकायला गेले कुमार वीर मनोज तळकर प्रथम क्रमांक साक्षी सचिन कांबळे द्वितीय क्रमांक,संस्कृती गणपत कांबळेकर तृतीय क्रमांक, कौस्तुभ जगन्नाथ मोरे चौथा क्रमांक व प्राप्ती रमेश घडशी पाचवा क्रमांक या पाच विद्यार्थ्यानी शिष्यवृत्ती मिळवली असल्याने यांचा सन्मान चिन्ह गुलाब पुष्प देऊन गौरवण्यात आले या शाळेची पट संख्या तिप्पट झाली असून १०३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत मुख्याध्यापक सुनील बैकर सहशिक्षक संतोष घुटुकडे व सहशिक्षक कोथिंबिरे मॅडम, विजापुरेसर, भिसे सर यांचा देखील उपस्थीत मान्यवरांचे हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी मिराताई शिगवण यांनी सन २०१६ पासूनची विद्यार्थी पट संख्येचा वाढता आलेख व पदवीधर शिक्षक बैकर व घुटुकडे यांच्या मुळे पट संख्या वाढत चालली आहे.सेमी इंग्रजी माध्यम सुरू करून या शिक्षणाचा पाया सुरू केला आजच्या काळात इंग्रजी माध्यमाची नितांत गरज असल्याने या प्रार्थमिक शाळेत पालकांचा पाल्याला प्रवेश घेण्याचा कल अधिक आहे. शिष्यवृती धारक विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत होते.या शिष्यवृतीचे यश हे या दोन शिक्षकांचे आहे.शिक्षणा बरोबर क्रिडा, सांस्कृतीक क्षेत्रात देखील मोलाचे शिक्षण देत आहेत. त्यामुळे शाळेची गुणवत्ता वाढत आहे.याचे श्रेय या शिक्षकांना देते.स्नेहसंमेलनघेऊनविद्यार्थांच्या अंगी असलेल्या कला गुणांना वाव मिळावा.या उद्देशाने स्नेह संमेलन गेली पाच सहा वर्षे घेत आहोत. केंद्रीय शाळेत स्व.सी डी देशमुख (माजी केंद्रीय अर्थमंत्री) या शाळेत श्रीगणेशाचा पाढा शिकून मोठे झाले.शाळेचे,गावाचे नांव उज्वल केले.इंग्रजी माध्यमचा खर्च परवडणारा नसल्याने गोरगरीब मुलांना शिक्षण देऊन त्यांची गुणवत्ता वाढवण्याचा ध्यास शिक्षक वर्ग करीत असून जागृत पालकांनी आपल्या पाल्यांना राजिप शाळेत प्रवेश घेऊन त्यांच्या उज्वल भवितव्याचे मानकरी व्हा असेआवाहनयावेळी उपस्थीत रसिक, पालकांना केले.