
धाक्सुद चिल्हे कबड्डी स्पर्धेत गावदेवी बाहे संघ अंतिम विजेता तर जय हनुमान आंबेवाड़ी संघ ठरला उपविजेता…..

धाक्सुद चिल्हे कबड्डी स्पर्धेत गावदेवी बाहे संघ अंतिम विजेता तर जय हनुमान आंबेवाड़ी संघ ठरला उपविजेता….. 
कोलाड (विशेष प्रतिनिधी) रोहा तालुक्यातील मौजे चिल्हे येथे कोलाड विभागीय कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने धाक्सुद चिल्हे युवक मंडळाने आयोजित केलेल्या कबड्डी स्पर्धेत गावदेवी बाहे संघ ठरला अंतिम विजेता तर जय हनुमान आंबेवाडी संघ ठरला उपविजेता ठरला असून स्पर्ध्येत सामनावीर बाहे संघाचा विजय माठल ,उत्कृष्ट चढाई आंबेवाडी संघाचा टिंकू,उत्कृष्ट पक्कड म्हणून बाहे संघाचा आतेश थिटे ,तर एकूण स्पर्धेत रसिकप्रेशकांच्या वतीने पब्लिकहिरो म्हणून वरसगांव संघाचा स्वप्नील पोटफोडे हे मानकरी ठरले आहेत.
अतिशय रंगदार आणि मजेदार रसिकप्रेशकाना मंत्रमुग्ध करून सोडणारा आपल्या लाल मातीतील मैदानी खेळ म्हणजे कबड्डीचा खेळ आहे याचा भरभरून आनंद तालुक्यातील मौजे चिल्हे येथे धाक्सुद चिल्हे युवकांच्या वतीने आयोजित केलेल्या चिल्हेच्या भव्य प्रांगणात पहावयास मिळाला तर हुडहुडणारी गुलाबी थंडी असतांना देखील या खेळाला विभागातील रसिकप्रेशकांचा मोठ्या संख्येने प्रतिसाद लाभला होता.
सदरच्या खेळात कोलाड विभागातून आलेल्या संघांनी या खेळात सहभाग नोंदवला होता तर मोठ्या उत्साही वातावरणात अंतिम फेरीचा सामना हा गावदेवी बाहे विरुद्ध जय बजरंग आंबेवाडी यांच्यात मोठी अटीतटीची लढत झाली अखेर बाहे संघाच्या विजय माठल यांनी उत्कृष्ट चढाईचा खेळ केला तर आतेश थिटे यांनी आंबेवाडी संघाच्या चढाई बहाद्दरांसमोर उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करत आपल्या आपल्या संघाला अंतिम विजेतेपद पटकावून दिले. तर जय बजरंग आंबेवाडी संघाला हार पत्करत उप विजेत्यावर समाधान मानावे लागले तर रंगतदार आणि मजेदार पार पडलेल्या कबड्डी खेळात तृतीय क्रमांक सापया वरसगांव तर चतुर्थ क्रमांक गावदेवी भुवन या संघाने पटकावले आहे .
उत्स्फुर्त प्रतिसाद लाभलेल्या व प्रकाशझोतात संपन्न करण्यात आलेल्या या स्पर्ध्येचे उदघाटन तळवली तर्फे अष्टमी ग्राम पंचायतीचे सरपंच रविंद्र मरवडे,उपसरपंच संदीप महाडिक, माजी कबड्डीपट्टू ठमाजी महाडिक,रोहा तालुका भाजप उपाध्यक्ष विनायक महाडिक,माजी सरपंच सौ मानसी लोखंडे,माजी उपसरपंच प्रमोद लोखंडे,युवानेते प्रमोद शिंदे,पत्रकार डॉ श्यामभाऊ लोखंडे,अलंकार खांडेकर,विनायक शिंदे,रोहा तालुका भाजप युवा मोर्चा तथा कोलाड विभागीय कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष महेश ठाकूर शक्ती महाबळे,सुरेश वाघमारे, विलास महाडिक,विलास शिंदे,मंगेश लोखंडे,संतोष वाळंज आदी कबड्डीखेळाडू व रसिकप्रेशकांच्या उपस्थित संपन्न झाले असून प्रसंगी यावेली धाक्सुद चिल्हेचे सर्व युवक कबड्डी खेळाडू बहुसंख्येने उपस्थित होते .
स्पर्धेतील विजेत्या संघाना व उत्कृष्ट खेळाडूंना प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते रोख रक्कम व चषक देऊन सन्मानित करून गौरविण्यात आले. तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धाक्सुद चिल्हे च्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.