श्रम संस्कार शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्त्व विकास साधावा : रवींद्र ठाकूर;सातिर्जे येथे चोंढी-किहिम महाविद्यालयाचे सात दिवसीय श्रम संस्कार शिबिर संपन्न…… 

ROHA TIMES

श्रम संस्कार शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्त्व विकास साधावा : रवींद्र ठाकूर;सातिर्जे येथे चोंढी-किहिम महाविद्यालयाचे सात दिवसीय श्रम संस्कार शिबिर संपन्न……

कोर्लई(राजीव नेवासेकर)शिक्षणाबरोबरच श्रम संस्कार शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील दैनंदिन जीवनाचा अनुभव आनंद घेता येतो.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून शैक्षणिक प्रगती होते.असे प्रतिपादन सातिर्जे येथे चोंढी-किहिम लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयाचे सात दिवसीय श्रम संस्कार शिबिराच्या समारोप प्रसंगी कार्यवाह रवींद्र ठाकूर यांनी केले.
चोंढी -किहिम येथील लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे सातदिवसीय श्रम संस्कार शिबिर सातिर्जे येथील या.जि.प.च्या प्राथमिक शाळेत दि.१६ जानेवारी ते दि.२२ जानेवारी २०२३ कालावधीत घेण्यात आले.त्यानिमित्ताने ग्रामसर्वेक्षण, स्वच्छता अभियान, श्रमदान, वन संवर्धन, पर्यावरण संवर्धन, व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम, महिला सक्षमीकरण कार्यक्रम,आरोग्य तपासणी आदी. विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.सदर शिबिराच्या समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांनी केलेल्या श्रमदानाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रवेश पाटील व सचिन गोंधळी यांचे रवींद्र ठाकूर यांनी कौतुक केले.
यावेळी सरपंच सौ.प्राजक्ता खडपे, उपसरपंच ॲड.उमेश ठाकूर, प्राचार्य सौ.लिना पाटील, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.सचीन गोंधळी,प्रा.प्रवेश पाटील, प्राध्यापक, विद्यार्थी प्रतिनिधी श्रेया साळुंखे,फैजान दाते,ओम घरत,अल्फिया तांबे, महाविद्यालयीन विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
रा.से. योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भाग समजून घेणे तेथील समस्या समजून घेणे, श्रमदानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणे. यासाठी दत्तक गावात 15 दिवसातून एकदा श्रमदान करणे, दिनचर्या चे महत्व राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा.तुलसीदास मोकल यांनी आपल्या भाषणात सांगितले तर सरपंच प्राजक्ता खडपे विद्यार्थ्यांनी कार्याचे कौतुक केले,मदत देण्याचे आश्वासन दिले,सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्या दिल्या
या कार्यक्रमा मध्ये विद्यार्थी कू.पूर्णा मळेकर , कू.अंजली शर्मा व कू.मंदार पाटील यांनी मनोगत व्यक्त केले .या कार्यक्रमाचे सूत्र संचालन कू.श्रेया साळुंके व आभार प्रदर्शन केले.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close