
कठीण काळात जो उभा राहतो, तोच टिकतो – रा.जि. सहसंपर्कप्रमुख किशोर जैन;बाळासाहेब ठाकरे यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त केले प्रतिपादन……

कठीण काळात जो उभा राहतो, तोच टिकतो – रा.जि. सहसंपर्कप्रमुख किशोर जैन;बाळासाहेब ठाकरे यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त केले प्रतिपादन…… 
नागोठणे(महेंद्र माने)येथील शिवसेना विभागीय शाखेत सोमवार 23 जानेवारी रोजी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 97 व्या जयंती निमित्त रायगड जिल्हा सहसंपर्क प्रमुख तथा रा.जि.प. सदस्य किशोर जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला तसेच बाळासाहेबांच्या प्रतिमेची विधिवत पुजाअर्चा व पुष्पहार अर्पण करून साजरा करण्यात आली. त्यावेळी कठीण काळात जो उभा राहतो;तोच शेवटपर्यंत टिकत असल्याचे प्रतिपादन किशोर जैन यांनी केले. त्यानंतर नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला सरपंच मिलिंद धात्रक,रायगड जिल्हा युवासेना विस्तारक सुधीर ढाणे, पं.स. सदस्य संजय भोसले तसेच शिवसेना महिला उपजिल्हा संघटिका दर्शना जवके, युवतीसेना जिल्हाधिकारी धनवंती दाभाडे ग्रा.पं. सदस्य ज्ञानेश्वर साळुंखे, उपविभागप्रमुख बळीराम बडे,शाखाप्रमुख धनंजय जगताप यांच्यासह प्रतिमा शिर्के,वर्षा कोळी,प्रणिता पत्की,कीर्तीकुमार कळस, सुरेश गायकर,बाळू रटाटे,प्रकाश मेस्त्री,अजय दळवी, मजित लंबाते, वैशाली शिर्के,अॅड.प्रकाश कांबळे,इम्रान पानसरे,विजय धामणे,समीर भिकन, यासमिन चोगले,तहेरीन शिंदी,आसिया सय्यद,नपिसा शिंदी,रुकसाना पठाण,शाहिरा भिकन,मेहताब भिकन,इकबाल शिंदी,रोहत शिंदी तसेच विभागातील शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना किशोर जैन यांनी सांगितले की,पाच पन्नास हजार माणसे आणली म्हणजे तुम्ही नेते झाल्यासारखे समजू नका त्यामध्ये दाखविण्यासाठी किती हे निवडणूकच दाखवेल व त्याच उत्तर मिळेलच.निवडणूक कोणतीही असो सर्वांचे उत्तर जनता नक्की देणार आहे. नवीन सरकार बसलं पण निवडणुका लागत नाहीत. जनतेच्या मनातलं केलंत तर घाबरता का?असा प्रश्न उपस्थित करून निवडणूक लांबवून पळ काढतात पण जनताही हुशार आहे. ते त्यांच्या मनातील कधीच सांगत नाहीत तर मतपेटीत दाखवितात. येणार्या प्रत्येक निवडणुकीत शिवसेनाप्रमुखांचे विचार उत्स्फूर्तपणे दिसतील असा विश्वास व्यक्त करून कठीण काळात जो उभा राहतो तोच शेवटपर्यंत टिकत असतो, तसे काही लोक वाढलेली पण आहेत. याबाबत आपल्या विभागातील कोणीही कुठेही गेले नसल्याने आपल्याला एकही डाग लागला नाही त्याबद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद देत असून हीच शिवसेनाप्रमुखांना आदरांजली असल्याचे शेवटी किशोर जैन यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार ऋत्विज माने यांनी केले.