
सोमजाई मंदिर प्रथम वर्धापन दिनांनिमित खा.तटकरेचा सत्कार,रायगड मध्ये महिलाचा घेणार मोठा रोजगार मेळावा – खा सुनील तटकरे……

सोमजाई मंदिर प्रथम वर्धापन दिनांनिमित खा.तटकरेचा सत्कार,रायगड मध्ये महिलाचा घेणार मोठा रोजगार मेळावा – खा सुनील तटकरे…… 
वावेदिवाळी इंदापुर(गौतम जाधव) एप्रिल महिन्यात रायगड मध्ये महिलाचा एक मोठा रोजगारा मेळावा घेणार असू या मेळाव्यातून महिला वर्गाला रोजगार निर्मिती विषय विविध प्रकारे माहिती दिली जाणार आहे असे रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी कोल्हाण येथील सोमजाई मंदिर प्रथम वर्धापण दिनांच्या कार्यक्रमात बोलताना सांगितले यावेळी दिपकशेठ जाधव सचिव राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र राज्य युवक,
उदय अधिकारी माजी उपसरपंच तळाशेत,संमिर मेहता उपसरपंच तळाशेत,बाळा खातू अध्यक्ष इंदापूर शहर,श्रध्दा यादव,मेघनाथ सातपुते,नितिन घोणे,संतोष यादव, सोमजाई ग्राम विकास कमिटी कोल्हाण नवनिर्वाचित अध्यक्ष राजेंद्र वाढवळ तसेच कोल्हाण ग्रामस्थ मुंबई मंडळ व महिला मंडळ तसेच श्री सोमजाई सांस्कृतिक कला व क्रिडा नवतरून मिञ मंडळ यावेळी उपस्थित होते.
यावेळी खा.तटकरे यांनी पुढे बोलताना सागीतले की मी एक देशाच्या महत्त्वाच्या कमिटीवर सदस्य असून या मध्ये लघु,सुक्ष्म,उद्योग स्वयम रोजगार समित्या आहेत याचा आढावा घेण्याच्या ज्या समित्या आहेत याच्या मद्यमातून मी केरळ,अंदमान,निकोबार,तामिळनाडू,राज्यस्थान,झारखड,या राज्यातुन जाऊन आलो अनेक वर्षे या सर्व योजनाचा आढावा घेतला काही ठिकाणी आद्योगती आहे
तर काही ठिकाणी प्रगती आहे.केरळ व तामिळ नाडू मधील महिलाची तर प्रचंड प्रगती असून त्यांनी बचत गटाची निर्मिती करत कोट्यावादी रूपयाची उलाढाल त्या ठिकाणी महिला करताना दिसत आहे.