
रसायनीत उमाताई मुंढे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम……

रसायनीत उमाताई मुंढे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम…… 
रसायनी(राकेश खराडे) राजिपच्या महिला व बालकल्याण माजी सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या रायगड जिल्हा अध्यक्षा उमाताई संदिप मुंढे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्यात येतात.यावर्षी शनिवार दि.4 फेब्रुवारी रोजी वाढदिवसाचे औचित्य साधून महिला बचत गटांना रोजगारासाठी दळण मशिन व पापड मशिनचे वाटप करण्यात आले.दिव्यांग(अपंग) यांना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.तर माजी सरपंच संदिप सुदाम मु़ंढे यांच्या प्रयत्नाने नवीन वसाहत रिस येथे डजबिनचे वाटप करण्यात आले.तसेच जेष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंच लावण्यात आले.जनता विद्यालय शाळेच्या ध्वजाजवळ हायमास्ट लावण्यात आले.यानंतर नविन पोसरी हनुमान मंदिराच्या पटांगणात विविध जातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.तर महिलांसाठी हळदीकुंकू व गुरु कदम पुरस्कृत चला खेळूया पैठणीचा खेळ हा मनोरंजनाचा कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमाला रसायनी परिसरातील असंख्य महिला उपस्थित होत्या.
उमाताई संदिप मुंढे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी वाटपप्रसंगी माजी सरपंच संदिप मुंढे, जेष्ठ समाजसेवक सुदाम मु़ंढे,माजी सरपंच अशोक मुंढे,उपसरपंच नयन कुरंगले, ग्रामविकास अधिकारी सचिन कुराडे,हभप तुकाराम महाराज लोभी,हभप मांडे महाराज,वृशाली म्हात्रे राष्ट्रवादी महिला आघाडी तालुका उपाध्यक्ष,वर्षा पाटील राष्ट्रवादी महिला विभागीय अध्यक्षा, रेश्मा चौधरी पंचायत समिती उपाध्यक्ष,मनाली शिंदे पंचायत समिती अध्यक्ष,विनया मुंढे चांभार्ली पंचायत समिती अध्यक्ष,सोनाली गोपाळे पंचायत समिती सचिव, अंजना मुंढे, राजश्री जांभळे,शारदा काळे आदीसह परीसरातील पदाधिकारी,शिक्षकांसह नागरिक उपस्थित होते.