
आरोग्य,क्रीडा,सांस्कृतिक या सर्वच क्षेत्रात रोटरी क्लबचे काम उल्लेखनीय -आ. आदीती तटकरे…….

आरोग्य,क्रीडा,सांस्कृतिक या सर्वच क्षेत्रात रोटरी क्लबचे काम उल्लेखनीय -आ. आदीती तटकरे……. 
नागोठणे(महेंद्र माने) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला रोहा रोटरी क्लबच्या माध्यमातून बेबी वॉर्मर मशीन,इन्व्हर्टर सुविधेचे शुक्रवार 03 जानेवारी रोजी आ.आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण करण्यात आली.त्यावेळी आरोग्य, क्रीडा,सांस्कृतिक या सर्वच क्षेत्रात रोटरी क्लबचे काम उल्लेखनीय असल्याचे आ.आदिती तटकरे यांनी सांगितले. यावेळी रा.काँ. विभागीय नेते भाई टके, रोहा रोटरी क्लबचे अध्यक्ष सुरेंद्र निंबाळकर, पुणे येथील डॉ.प्रवीण बढे, नागोठणे रोटरी क्लब अध्यक्ष सचिन मोदी, प्रा.आ. केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य शिरसाट यांच्यासह पिगोंडे सरपंच संतोष कोळी,वणी सरपंच प्रगति आवाद,राजेंद्र पोकळे, डॉ.गंगाराम कोकणे, डॉ.रोहिदास शेळके,डॉ.सुनील पाटील,डॉ.अभिषेक शहासने,बाळासाहेब टके,प्रमोद जांबेकर,सचिन कळसकर,अतुल काळे,विनायक गोळे,आनंद लाड, दिनेश घाग,गौतम जैन,बिपिन सोष्टे,उल्हास शिंदे,दिपेंद्र आवाद,श्रेया कुंटे,सुजाता जवके,प्रतिभा तेरडे,प्रियांका पिंपळे यांच्यासह रोटरी क्लबचे पदाधिकारी- सदस्य व आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.
आपल्या भाषणात आ.आदिती तटकरे यांनी सांगितले की, रोटरी क्लबच्या सदस्या असून क्लबच्या माध्यमातून आरोग्य,क्रीडा, सांस्कृतिक या सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असल्याचे मला समाधान वाटत आहे. आरोग्य हा आपला महत्वाचा घटक असून रोटरी क्लबच्या माध्यमातून जिल्ह्यात साधारण 35 प्रा.आ.केंद्रात बेबी वॉर्मर मशीन भेट स्वरूपात देण्यात आली आहेत. हे अतिशय पुण्याचे काम असून त्याचा उपयोग कुठे ना कुठेतरी नवजात बालकांना नक्कीच होणार आहे. तसेच नवजात बालकाला जन्म देणार्या आईलाच्याही मनाला खात्री होईल की,माझ्या बाळाला काही झालं तर येथे या ठिकाणी बेबी वॉर्मर मशीन आहे याचे समाधान होणार असल्याचे सांगून या मशीनचे लोकार्पण आज माझ्या हस्ते नागोठण्यात होत असल्याचा जास्त आनंद होत असल्याचे शेवटी आ.आदिती तटकरे यांनी सांगितले.
रुग्णालयासाठी लागणारी जागा मोफत देणार – सचिन मोदी
बेबी वॉर्मर मशीन,इन्व्हर्टर लोकार्पण कार्यक्रमाच्या वेळी नागोठणे रोटरी क्लब अध्यक्ष सचिन मोदी यांनी या विभागात अनेक अपघात होत असून येथे जवळ पास कुठेही सुसज्ज असे रुग्णालय नाही;रोटरी क्लबच्या माध्यमातून येथे सर्व सुखसोयीचे रुग्णालय होण्याची माझी इच्छा असल्याचे सांगून त्यासाठी लागणारी जागा ही आम्ही मोदी कुटुंबियांकडून मोफत देणार असल्याचे शेवटी मोदी यांनी सांगितले.