
जिल्हास्तरीय अभिरुप न्यायालय स्पर्धेत ॲड. दत्ता पाटील विधी महाविद्यालयाची बाजी………

जिल्हास्तरीय अभिरुप न्यायालय स्पर्धेत ॲड. दत्ता पाटील विधी महाविद्यालयाची बाजी……… 
ॲड.दत्ता पाटील कॅालेज ऑफ लॅा आणि अखिल भारतीय अधिवक्ता परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि.०४ फेब्रुवारी २०२३ रोजी ॲड.दत्ता पाटील कॅालेज ऑफ लॅाच्या मुट कोर्ट सभागृहामध्ये जिल्हास्तरीय अभिरुप न्यायालय(मुट कोर्ट)२०२३ चे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जनता शिक्षण मडळाचे अध्यक्ष मा. ॲड.गौतमभाई पाटील यांनी स्पर्धेच्या उद्धाटन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की, वकिली व्यवसायामध्ये सतत नवनवीन गोष्टी आत्मसात करणे आवश्यक आहे आणि सरावानेच कौशल्य प्राप्त होते. अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेचे जिल्हा अध्यक्ष ॲड.संतोष पवार यांनी विद्यार्थ्यांना सतत अभ्यास करण्याचा सल्ला दिला. तसेच ॲड.पुष्कर मोकल यांनी विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे वकिली करण्याचा सल्ला दिला. अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेचे कोषाध्यक्ष ॲड. श्रीराम ठोसर व ॲड.दत्ता पाटील विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या ॲड.नीलम हजारे यांनी प्रास्ताविक सादर केले.या स्पर्धेमध्ये रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील एकूण ०६ महाविद्यालयातील ०९ संघांनी आणि २६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ॲड.शिरिष लेले आणि ॲड.पुष्कर मोकल यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात ॲड.शिरिष लेले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दावा कसा दाखल कसा करावा, संदर्भ पुस्तके आणि केस लॅा यांचा कसा अभ्यास आणि उपयोग करावा याविषयी उत्तम माहिती दिली. इंटरनेटवरुन फक्त कॅापी-पेस्ट न करता त्याचे वाचन करावे असा सल्ला दिला. या स्पर्धेत ॲड.दत्ता पाटील विधी महाविद्यालयाच्या (कु.चिन्मय राणे,कु.अनुजा नाशिककर,कु.सुरज पुरी)यांच्या संघाने प्रथम क्रमांक तर(कु.प्रतिक पाटणकर,कु. कौशिक बोडस,कु.श्रध्दा वैशंपायन) यांच्या संघाने द्वितिय क्रमांक प्राप्त केला. उत्तम वक्ता म्हणून प्रथम क्रमांक श्री.राजेश विकास वैशंपायन(अशोकदादा साबळे लॅा कॅालेज,माणगाव, द्वितीय क्रमांक कु.सारीका मनोहर शिंदे(बाळासाहेब ठाकरे लॅा कॅालेज,पनवेल),तृतीय क्रमांक श्री.अक्षय अशोककुमार मिसाळ (के.एल.ई.लॅा कॅालेज)यांना प्राप्त झाले. सर्व विजयी स्पर्धकांना स्मृतीचिन्ह,भेटवस्तू आणु पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड.गौतम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या ॲड. नीलम हजारे,प्रा. ॲड .निलम म्हात्रे,प्रा.ॲड.संदिप घाडगे,प्रा.ॲड.मेघा पलकपरांबिल, प्रा.ॲड.मनोज धुमाळ आणि प्रा.मिलिंद आठवले,श्री.प्रपेश पाटील, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी स्वयंसेवकांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.