शिवसेनेचे कार्यकर्ते लिलाधर खातू यांची जिल्हा नियोजन समीती सदस्यपदी नियुक्ती…… 

ROHA TIMES

शिवसेनेचे कार्यकर्ते लिलाधर खातू यांची जिल्हा नियोजन समीती सदस्यपदी नियुक्ती……
तळा(किशोर पितळे)तळा शहरातील बाळासाहेबांची शिवसेना (शिंदेगट)चे जेष्ठ शिवसैनीक तथा निष्ठावंत कार्यकर्ते लिलाधर खातू यांची दक्षीण रायगड जिल्हा नियोजन समीती सदस्यपदी महाड पोलादपूर चे आमदार भरतशेट गोगावले यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.जिल्हा नियोजन समीती सदस्यपद अतीशय महत्वाचे स्थान मानले जाते.
लिलाधर खातू कै.बाळशेठ लोखंडे यांच्या तालमीत तयार झालेले धुर्त जाणकार राजकारणी म्हणून ओळखले जाते.ग्रामपंचायत ते नगरपंचायत शिवसेनेची सत्ता आणण्यात नंबर वन असालौकिक मिळवलाआहे. नगरपंचायतीत पहीली सेनेची सत्ता आणण्यात आणी विरोधकांना घरीबसवण्यात मोठी कामगीरी करुन बलाढ्य उमेदवाराला आपल्या वार्डातून सेनेच्या उमेदवार पत्नी सायली खातू यांना पहील्या नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षा पदी बसवण्यात हात खंडा होता.यावेळीनगरपंचायती वर बहुमत सिध्दकरून सेनेची सत्ता बसवली.तालूक्यातील राजकारणात देखील रणनीती यशस्वी ठरली.त्याच्या कार्याची दखल घेत बाळासाहेबांची शिवसेना(शिंदे गटाचे) पक्ष प्रतोद भरतशेट गोगावले यांनी दक्षीण रायगड जिल्हा नियोजन समिती सदस्य पदी नियुक्ती केली. यावेळी जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर शहर प्रमुख राकेश वडके, संपर्क प्रमुख अॅड.चेतन चव्हाण नगरसेवक नरेश सुर्वे,मंगेश पोळेकर नमीत पांढरकामे यासह अनेक शिंदे गटाचे शिवसैनीक कार्यकर्ते उपस्थीत होते.त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close