
टाकेदेवी रिक्षाचालक-मालक संघटनेच्या अध्यक्षपदी संदीप सुदाम मुंढे…….

टाकेदेवी रिक्षाचालक-मालक संघटनेच्या अध्यक्षपदी संदीप सुदाम मुंढे……. 
रसायनी(राकेश खराडे) रसायनी परिसरातील कार्यरत असलेल्या रिक्षा चालक मालक संघटनेच्या अध्यक्षपदी नुकतीच माजी सरपंच संदीप सुदाम मुंढे यांची निवड करण्यात आली.
रिक्षा चालक- मालक संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत महाडिक यांचे दुःखद निधन झाल्यानंतर टाकेदेवी रिक्षा चालक- मालक संघटनेचे अध्यक्षपद रिक्त होते. परिसरातील रिक्षा चालकांनी यावेळी अध्यक्षपदाची धुरा संदीप सुदाम मुंढे यांच्यावर सोपवली असून परिसरातील रिक्षा चालकांच्या समस्या मार्गी लावण्याचे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी टाकेदेवी रिक्षा चालक- मालक संघटनेच्या उपाध्यक्षपदी सतीष चंद्रकांत महाडिक यांची निवड करण्यात आली. परिसरातील १ हजाराहून अधिक रिक्षा चालक टाकेदेवी रिक्षा चालक- मालक संघटनेशी संलग्न असून त्यांनी संदीप सुदाम मुंढे व सतीष चंद्रकांत महाडिक यांची निवड केली आहे. यावेळी टाकेदेवी रिक्षा चालक-मालक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.