ग्रुप ग्रामपंचायत मेढा उपसरपंच पदी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या श्रेजल वि. उंबरे बिनविरोध…… 

ROHA TIMES

ग्रुप ग्रामपंचायत मेढा उपसरपंच पदी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या श्रेजल वि. उंबरे बिनविरोध……

मेढा (उदय मोरे) – रोहा तालुक्यातील प्रतिष्टीत समजल्या जाणा-या ग्रुप ग्रामपंचायत मेढा या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी सरपंच स्नेहा महेंद्र खैरे यांच्या अध्यक्षखाली उपसरपंच पदाची निवडणुक घेण्यात आली उपसरपंच पदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या श्रेजल विलास उंबरे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणुकीच्या सर्व प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर श्रेजल उंबरे यांचा अर्ज वैध ठरवून त्यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणुक अधिकारी तथा सरपंच स्नेहा खैरे यांनी केली. या झालेल्या निवडणुक प्रक्रियेत सरपंच स्नेहा खैरे मावळते उपसरपंच ज्ञानेश्वरी गोवर्धने, सदस्य रविंद्र जाधव, सदस्य उदय मोरे, सदस्य जगदिश घरट, सदस्या नम्रता महाले, सदस्या ज्ञानेश्वरी गोवर्धने, सदस्या नम्रता सुतार, सदस्या समिक्षा जवके सदस्या, शेवंती शिद यांनी सहभाग घेऊन उपस्थिती दर्शवली. मावळते उपसरपंच ज्ञानेश्वरी गोवर्धने यांनी आपला उपसरपंच पदाचा कार्यकाल पुर्ण केल्याने त्यांनी राजीनामा दिल्याने सदर उपसरपंच पदाची निवडणुक घेण्यात आली.
उपसरपंच पदी श्रेजल विलास उंबरे यांची निवड झाल्यानंतर सरपंच स्नेहा खैरे, मावळते उपसरपंच ज्ञानेश्वरी गोवर्धने व उपस्थित सदस्यांनी यांना सन्मानी उपसरपंच पदाच्या आसनात बसविले व त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले दरम्यान विभागीय राष्ट्रवादीचे नेते भगवान केशव गोवर्धने, कार्यअध्यक्ष रोहा तालुका युवक राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी महेंद्र खैरे, उपअध्यक्ष रोहा तालुका विलास खांडेकर, ग्रामसेवक अमोल तांबडे यांनी उपसरपंच श्रेजल विलास उंबरे यांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार व अभिनंदन केले. तसेच उपसरपंच श्रेजल उंबरे यांचे माजी पालकमंत्री आदितीताई तटकरे, आमदार अनिकेतभाई तटकरे, जिल्हा कार्यअध्यक्ष मधुशेठ पाटील, सदस्य सरचिटनिस विजयराव मोरे, माजी सभापती राजेश्री पोकळे, रोहा तालुका राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष विनोद पाशिलकर, तालुका युवक अध्यक्ष महेंद्र खैरे, अनेक मान्यवरानी निवडीबाबत समाधान व्यक्त करुन अभिनंदन केले आहे.
या उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी मेढा ग्रा.पं. तंटामुक्त अध्यक्ष भगवान गोवर्धने, विलास खांडेकर, माजी सरपंच विलास उंबरे, माजी सरपंच संतोष सुतार, रघुनाथ करंजे, विजय मोरे, चंद्रकांत गोवर्धने, संतोष जवके, राजेंद्र घरट, नरेश शिद, प्रतिक वजले, आत्माराम घरट, अशोक लाड, शरद गोवर्धने, प्रभाकर दाईटकर, नथुराम निवळे,तानाजी घरट, चंद्रकांत पवार, दिपेश महाले, होनाजी शेलार, कृष्णा घरट, राकेश गोवर्धेने,निलेश गोवर्धेने, प्रभाकर गोवर्धेने, गजानन धकाते , दिनकर पवार, राजेंद्र पाब्रेकर , नंदकिशोर दाईटकर , जयंता गोवर्धेने, प्रकाश गोवर्धेने, चंद्रकांत खैरे,शैलेश गोवर्धने, वृषाल गोवर्धेने, सागर गोवर्धेने, शुभम उंबरे, प्रथमेश उंबरे,ओमकार उंबरे,अनिकेत उंबरे , श्रवण पाब्रेकर, पियुष पोळेकर,हृतिक गोवर्धेने, अथर्व मोहिते, छगन सुरेश लाड, रागिणी गोवर्धने, आदिमान्यवर उपस्थित होते. निवडणुक बिनविरोध व शांतेत पार पाडल्याने ग्रामसेवक तांबडे यांनी सर्वांचे आभार मानले.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close