
मांजरवणे पद्मावती देवीचा यात्रौत्सव कार्यक्रम 4 एप्रिल रोजी…..

मांजरवणे पद्मावती देवीचा यात्रौत्सव कार्यक्रम 4 एप्रिल रोजी…..
माणगांव(महेश शेलार) माणगांव तालुक्यातील मांजरवणे विभागातील पद्मावती देवी हे जागृत देवी स्थान म्हणून परिचित आहे. मंगळवार दि.4 एप्रिल 2023 रोजी पद्मावती देवी यात्रौत्सव सालाबादप्रमाणे करण्यात येणार आहे अशी माहिती श्री पद्मावती देवी मंदिर ट्रस्टचे सचिव सुरेश दगडू चव्हाण यांनी दिली आहे.
यात्रेसाठी मांजरवणे व साई परिसरातील बहुसंख्याने भक्तगण उपस्थित राहतात. तसेच नोकरी निमित्त मुंबई, पुणे, गुजरात याठीकणी असलेले भक्तगण सुद्धा पद्मावती देवीच्या दर्शनासाठी मोठया संख्येने उपस्थित असतात. तसेच चैत्र पौर्णिमेच्या एक दिवस अगोदर असणाऱ्या या यात्रेला भाविक मोठ्या संख्येने हजर राहतात.
यात्रेत परिसरातील गोवेल, चांदोरे, मुद्रे, बाट्याची वाडी, निगुडमाळ, वडाची वाडी या गावातून जत्र काट्या घेऊन भाविक या यात्रेत सहभागी होतात. हा यात्रा उत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी श्री पद्मावती देवी मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी, विश्वस्त व ग्रामस्थ मेहनत घेत असतात.