
मोहोपाड्यात मोफत महाआरोग्य शिबिर,621 नागरिकांनी घेतला लाभ….

मोहोपाड्यात मोफत महाआरोग्य शिबिर,621 नागरिकांनी घेतला लाभ…. 
रसायनी(राकेश खराडे) मोहोपाडा येथील श्रीपाद मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलच्या सहकार्याने डॉ.डि.वाय.पाटील नेरुल,आर.आर.झुनझुनवाला शंकरा नेत्र चिकित्सा हाॅस्पिटल,सुश्रुषा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, डॉ खान फिजिओथेरपी यांच्या संयुक्त विद्यमाने मोहोपाडा येथे डॉ संजय म्हात्रे यांच्या श्रीपाद हाॅस्पिटलच्या आवारात मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात विविध तपासण्या करून 621 नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.यावेळी रक्तदान, मोफत नेत्र चिकित्सा व मोतिबिंदू शस्त्रक्रिया, हृदयरोग तपासणी व मोफत फिजिओथेरपी,स्त्रियांचे आजार व उपचार,हाडांचे उपचार,ईसीजी, रक्तशर्करा, रक्तदाब आदी तपासणी व मोफत औषधोपचाराचा लाभ रसायनीकरांनी घेतला.या शिबिरात 98 रुग्णांची जनरल तपासणी,102 नागरिकांची हाडांची तपासणी,19 जणांनी रक्तदान,97 जणांची हृदयरोग तपासणी,207 जणांची नेत्र तपासणी, मोतिबिंदू 28, फिजिओथेरपी 70 असे 621 जणांनी मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला.यावेळी डॉ संजय ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी रुग्णांना आजारविषयक मोफत मार्गदर्शन केले.