नांदगावच्या अमृतेश्वर मंदीरात रामनवमी उत्साहात साजरी…… 

ROHA TIMES

नांदगावच्या अमृतेश्वर मंदीरात रामनवमी उत्साहात साजरी……
कोर्लई(राजीव नेवासेकर) मुरुड तालुक्यातील नांदगावच्या अमृतेश्वर मंदीरात रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली.हया उत्सवाला शंभर वर्षांची परंपरा आहे.

यादिवशी अमृतेश्वर मंदीरात प्रभू श्रीराम मुर्तीची विधिवत पूजा अर्चा व अभिषेक करण्यात आला.यावेळी पाली येथील प्रसिद्ध किर्तनकार अवनी धनंजय गद्रे यांचे श्रीराम जन्मावर किर्तन झाले.
अमृतेश्वर मंदिर पंचकमिटी अध्यक्ष उमाकांत चोरघे, उपाध्यक्ष कुसूमाकर घुमकर,विद्याधर चोरघे,सचीव प्रभाकर निरकर,खजीनदार निरकरगुरुजी, सदस्य विष्णू नागांवकर, उदय रणदिवे यांसह परीसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे औचित्य साधून यावेळी अमृतेश्वर मंदिर पंच कमिटीतर्फे यांचा श्रीशंकर मुर्ती, शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close