
बोर्लीपंचतन,दिघी,आदगावमधे रामनवमी भक्तीभावात साजरी……

बोर्लीपंचतन,दिघी,आदगावमधे रामनवमी भक्तीभावात साजरी……
बोर्लीपंचतन(मकरंद जाधव) श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन,दिघी,आदगाव येथे श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावात साजरा करण्यात आला.
बोर्लीपंचतनमधे गणपती मंदीरात तर दिघी,आदगाव येथे राम मंदीरात सालाबादप्रमाणे रामनवमीचा जल्लोष पहायला मिळाला. महिला पुरुषांसह अबालवृद्धांचा उत्स्फूर्त सहभाग असलेल्या या श्रीराम जन्माचा डोळ्याचं पारणं फेडणारा सोहळा प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी भाविकांनी मंदिरांमधे सकाळपासूनच गर्दी केली होती.दुपारी बारा वाजता फुलांनी सजवलेल्या पाळण्यात श्रीरामाची मूर्ती ठेवून पाळण्याला झोका देत पाळणा गाऊन रामनामाच्या जयघोषात हा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यांनतर सर्वांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं.