
आमदार चषकानिमित्त नागोठण्यात उडणार कबड्डीचा धुरळा;जिल्हास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन……

आमदार चषकानिमित्त नागोठण्यात उडणार कबड्डीचा धुरळा;जिल्हास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन……
नागोठणे(महेंद्र माने) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील आठवडा बाजार मैदानात सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित रायगड जिल्हा कबड्डी असो.मान्यतेने शनिवार 01 एप्रिल सायं. 05.00 वाजता जिल्हास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धा आमदार चषक 2023 चे आयोजन करण्यात आले आहे.या दिव्यभव्य आमदार चषक 2023स्पर्धेचे उद्घाटन खा. सुनील तटकरे यांच्या हस्ते होणार असून यावेळी आ. अनिकेत तटकरे,आ. आदिती तटकरे,महाराष्ट्र कबड्डी असो. कार्याध्यक्ष आस्वाद पाटील यांच्यासह रा.कॉ.रायगड जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, रो.ता.कबड्डी असो. अध्यक्ष विजय मोरे, रा.कॉ. रोहा तालुकाध्यक्ष विनोद पाशीलकर, रा.यू॰कॉ. रायगड जिल्हाध्यक्ष अंकित साखरे,माजी जि.प.सदस्य नरेंद्र जैन, रा.कॉ. पेण सुधागड मतदार संघ अध्यक्ष शिवराम शिंदे, रा.कॉ.जेष्ठ नेते भाई टके,माजी सभापति पं.स.सदानंद गायकर व रा.कॉ. नागोठणे विभागीय अध्यक्ष संतोष कोळी आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक 33,333 /- व आकर्षक चषक, व्दितीय क्रमांक 22,222 /- व आकर्षक चषक,तृतीय क्रमांक 11,111 /- व आकर्षक चषक,चतुर्थ क्रमांक 11,111 /- व आकर्षक चषक तसेच उत्कृष्ठ खेळाडू एल.आय.डी.टी.व्ही,उत्कृष्ठ पकड सायकल,उत्कृष्ठ चढाई कूलर व पब्लिक हीरो मिनी फ्रीज बक्षीस देऊन गौरविण्यात येणार असून या स्पर्धेचा लाभ जिल्ह्यातील सर्व कबड्डी संघ व कबड्डी प्रेमीने घेण्याचे आवाहन नागोठणे विभाग,सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानने केले आहे.