लोकप्रिय गीतांची ” बिटींग मंडे ब्ल्युज ” संगीत मैफल संपन्न…

[avatar]

लोकप्रिय गीतांची ” बिटींग मंडे ब्ल्युज ” संगीत मैफल संपन्न…

मुंबई प्रतिनिधी: (लक्ष्मण राजे)
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात बरेच  दिवस घरात बसलेल्या संगीतप्रेमी रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी आता सर्व थिएटर बंद असल्याने डिजिटल प्लॅटफॉर्म वरुन सुरेल गाण्यांची संगीत मैफल आयोजित करण्याचा नवा ट्रेंड सुरू झाला आहे. त्याच अनुषंगाने त्रिनयानी एनजीओ या सामाजिक संस्थेच्या वतीने  रितिका सहानी प्रेझेंटस् *” बिटींग मंडे ब्ल्युज ” लोकप्रिय सुरेल गीतांच्या मनोरंजक कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली होती.निर्माती रितिका सहानी यांच्या संकल्पनेतून लोकप्रिय  गीतांची ” बिटींग मंडे ब्ल्युज ”  ही सुरेल संगीत मैफल डिजिटल प्लॅटफॉर्म वरुन आॅनलाईन सादर करण्यात आली.निर्माती रितिका सहानी यांनी सादर केलेल्या सुरेल लोकप्रिय गाजलेल्या गाण्यांची ” बिटींग मंडे ब्ल्युज “* या आॅनलाईन कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायिका महालक्ष्मी अय्यर  , शिबानी घोष , शनोली सेन ( अॅकाॅरडियन वादक ) , रितिका सहानी, गायक अर्नब चक्रबोर्ती , दिवाकर शर्मा, शुभ मुखर्जी , रितविक राजन आणि उदय शिरूर ( शीळ वादक ) या गायकांनी गाजलेली लोकप्रिय मधुर  गीते सादर केली. विशेषतः सुप्रसिद्ध लोकप्रिय गायक आणि सुरेल शीळ वादक उदय शिरूर यांनी शीळ वादन करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. तसेच चुतीर पाठशाला सदस्य सहभागी झाले होते. या रंगतदार यशस्वी आॅनलाईन कार्यक्रमाला रसिकांचा प्रचंड , उत्तम प्रतिसाद मिळाला. तसेच या कार्यक्रमाचा असंख्य रसिकांनी इव्हेंट आॅर्गनायझर रितिका सहानी यांच्या फेसबुक लाईव्ह पेज वरून आणि यू ट्यूब चॅनल वरून अनेकदा आनंद घेतला.या अविस्मरणीय कार्यक्रमाच्या अभूतपूर्व यशानंतर रितिका सहानी यांनी म्युझिकल  डिजिटल प्लॅटफॉर्म वरुन विविध संकल्पना घेऊन सुरेल गाण्यांच्या मैफलीचे आयोजन करून रसिकांना घरबसल्या आनंददायी सुरेल संगीताचा नजराणा देण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन, असे मनोगत व्यक्त केले .

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close