लोकप्रिय अविस्मरणीय सुमधुर मराठी भावगीतांची  “शारदा सुंदर चंदेरी राती ” संगीत मैफल संपन्न…

[avatar]
लोकप्रिय अविस्मरणीय सुमधुर मराठी भावगीतांची  “शारदा सुंदर चंदेरी राती ” संगीत मैफल संपन्न…
मुंबई प्रतिनिधी: (लक्ष्मण राजे)
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात बरेच  दिवस घरात बसलेल्या संगीतप्रेमी रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी आता सर्व थिएटर बंद असल्याने डिजिटल प्लॅटफॉर्म वरुन सुरेल गाण्यांची संगीत मैफल आयोजित करण्याचा नवा ट्रेंड सुरू झाला आहे. त्याच अनुषंगाने निर्माता दिग्दर्शक मिलिंद खातू यांच्या एम एम म्युझिक तर्फे ” शारद सुंदर चंदेरी राती ” या लोकप्रिय सुरेल मराठी भावगीतांच्या मनोरंजक कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली होती.निर्माता मिलिंद खातू यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या  सुमधुर ,  सुरेल , अविस्मरणीय लोकप्रिय भावगीतांची  “शारद सुंदर चंदेरी राती ” ही सुरेल संगीत मैफल  डिजिटल प्लॅटफॉर्म वरुन आॅनलाईन सादर करण्यात आली.निर्माता मिलिंद खातू यांच्या एम एम म्युझिक तर्फे सादर केलेल्या अविस्मरणीय सुमधुर लोकप्रिय गाजलेल्या गाण्यांच्या ” शारद सुंदर चंदेरी राती ” या आॅनलाईन कार्यक्रमात वृषाली घाणेकर, अनघा , स्वप्नजा  शिंदे , संपदा , संगीता पाटील आणि स्नेहल प्रभु या गायिकांनी गाजलेली मधुर  भावगीते सादर केली.या सुरेल संगीत मैफिलीचे सुत्रसंचलन , निवेदन आर जे सोनाली पाठक यांनी केले. या यशस्वी आॅनलाईन कार्यक्रमाला रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला . विशेषतः भारतासह कॅनडा , मास्को , यूएसए , यूएई , यूके अशा जगभरातील मराठी भावगीतांच्या चाहत्यांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. तसेच असंख्य रसिकांनी इव्हेंट आॅर्गनाईझर मिलिंद खातू यांच्या यू ट्यूब चॅनल वरून अनेकदा आनंद घेतला . या अविस्मरणीय कार्यक्रमाच्या अभूतपूर्व यशानंतर मिलिंद खातू  यांनी एम एम म्युझिक तर्फे डिजिटल प्लॅटफॉर्म वरुन विविध संकल्पना घेऊन  सुरेल मराठी गाण्यांच्या मैफलीचे आयोजन करून रसिकांना घरबसल्या आनंददायी सुरेल भावगीतांचा नजराणा देण्यासाठी एम एम म्युझिक सदैव प्रयत्नशील राहील असे मनोगत व्यक्त केले .

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close