अभिनेत्री हेमामालिनी यांच्या लोकप्रिय अविस्मरणीय हिंदी चित्रपट गीतांची ” ड्रीमगर्ल ” संगीत मैफल संपन्न…

[avatar]

अभिनेत्री हेमामालिनी यांच्या लोकप्रिय अविस्मरणीय हिंदी चित्रपट गीतांची ” ड्रीमगर्ल ” संगीत मैफल संपन्न…

मुंबई प्रतिनिधी: (लक्ष्मण राजे)
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात बरेच  दिवस घरात बसलेल्या संगीतप्रेमी रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी आता सर्व थिएटर बंद असल्याने डिजिटल प्लॅटफॉर्म वरुन सुरेल गाण्यांची संगीत मैफल आयोजित करण्याचा नवा ट्रेंड सुरू झाला आहे. त्याच अनुषंगाने म्युझिक लव्हर आणि सरगम म्युझिकल लॅब प्रेझेंटस् अभिनेत्री हेमामालिनी यांच्या लोकप्रिय अविस्मरणीय *” ड्रीमगर्ल ” या हिंदी चित्रपटातील सुरेल सुमधुर गीतांच्या मनोरंजक कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली होती.निर्माता रमेश भाटीया , साकेत जैन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या अभिनेत्री हेमामालिनी यांच्या गाजलेल्या सुरेल गाण्यांची, अविस्मरणीय लोकप्रिय हिंदी गीतांची ” ड्रीमगर्ल ” ही सुरेल संगीत मैफल म्युझिक लव्हर , सरगम म्युझिकल लॅब डिजिटल प्लॅटफॉर्म वरुन आॅनलाईन सादर करण्यात आली.निर्माता रमेश भाटीया , साकेत जैन यांच्या म्युझिक लव्हर ,सरगम म्युझिकल लॅब तर्फे सादर केलेल्या अविस्मरणीय सुमधुर लोकप्रिय गाजलेल्या गाण्यांच्या ” ड्रीमगर्ल “* या आॅनलाईन कार्यक्रमात अनुजा , जेनिफर , लीना , रिंकु , प्रिया , शिखा , तन्वी , वंदना , सुबेन्धु , विकास, योगेश, सागर आणि साकेत जैन या गायकांनी  गाजलेली मधुर  गीते सादर केली.या सुरेल संगीत मैफिलीचे सुत्रसंचलन , निवेदन विनायक  शिंदे आणि वर्षा धागट यांनी केले. या यशस्वी आॅनलाईन कार्यक्रमाला रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला . विशेषत: हेमामालिनी यांच्या असंख्य चाहत्यांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.तसेच असंख्य रसिकांनी इव्हेंट आॅर्गनाईझर साकेत जैन आणि रमेश भाटीया  यांच्या म्युझिक लव्हर फेसबुक लाईव्ह पेज वरून आणि यू ट्यूब चॅनल वरून अनेकदा आनंद घेतला . या अविस्मरणीय कार्यक्रमाच्या अभूतपूर्व यशानंतर  यांनी सरगम म्युझिकल लॅब डिजिटल प्लॅटफॉर्म वरुन विविध संकल्पना घेऊन हिंदी चित्रपटातील  सुरेल गाण्यांच्या मैफलीचे आयोजन करून रसिकांना घरबसल्या आनंददायी सुरेल संगीताचा नजराणा देण्यासाठी म्युझिक लव्हर आणि सरगम म्युझिकल लॅब सदैव प्रयत्नशील राहील असे रमेश भाटीया आणि साकेत जैन यांनी मनोगत व्यक्त केले .

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close