लोकप्रिय गायक अरुण दाते यांच्या सुमधुर मराठी युगुलगीतांची  “हात तुझा हातातून ” संगीत मैफल संपन्न…

[avatar]

लोकप्रिय गायक अरुण दाते यांच्या सुमधुर मराठी युगुलगीतांची  “हात तुझा हातातून ” संगीत मैफल संपन्न…

 मुंबई प्रतिनिधी: (लक्ष्मण राजे)
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात बरेच  दिवस घरात बसलेल्या संगीतप्रेमी रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी आता सर्व थिएटर बंद असल्याने डिजिटल प्लॅटफॉर्म वरुन सुरेल गाण्यांची संगीत मैफल आयोजित करण्याचा नवा ट्रेंड सुरू झाला आहे. त्याच अनुषंगाने माणिक एन्टरटेन्मेंट आयोजित ” हात तुझा हातातून ” या लोकप्रिय सुरेल मराठी युगुलगीतांच्या मनोरंजक कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली होती. सुमधुर ,  सुरेल , अविस्मरणीय लोकप्रिय युगुल गीते अरुण दाते म्युझिक चॅनल या यूट्यूब चॅनल वर आॅनलाईन सादर करण्यात आली.  ” या आॅनलाईन कार्यक्रमात अरूण दाते आणि कविता कृष्णमूर्ती या  गायकांनी १० गाजलेली मधुर युगुलगीते सादर केली.या सुरेल संगीत मैफिलीचे सुत्रसंचलन , निवेदन निवेदिका रत्ना दहिवेलकर यांनी केले. या यशस्वी आॅनलाईन कार्यक्रमाला रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला . विशेषतः अरुण दाते यांच्या मराठी भावगीतांच्या चाहत्यांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close