अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त पुणे शाखेत सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते सभासदांना दिल्या भेट वस्तू…

[avatar]
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त पुणे शाखेत सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते सभासदांना दिल्या भेट वस्तू…
मुंबई प्रतिनिधी:( लक्ष्मण राजे )
 अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा वर्धापन दिन पुणे शाखेत अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांचे हस्ते केक कापून साजरा करण्यात आला.
वर्धापन दिनाचे औचित्य साधून ओज आयुर्वेद व सुहाना मसाले यांचे सौजन्याने महामंडळाच्या सभासदांना सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आली.
याप्रसंगी ओज व सुहाना मसालेचे श्री. तरे, अभिनेता जयेश संघवी व महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले उपस्थित होते. या समारंभाचे आयोजन ओज आयुर्वेद व सुहाना तर्फे कार्यकारी निर्माता अमोल भगत यांनी केले होते. अ.भा.म.चि.तर्फे या आयोजनात अण्णा गुंजाळ, विनय जवळगीकर, योगेश जोशी, मंगेश नगरे, प्रशांत बोगम, नागनाथ गवसाने यांचा प्रमुख सहभाग होता.अशी माहिती विशाल पवार यांनी दिली.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close