सुरेल सुमधुर अविस्मरणीय हिंदी चित्रपट युगुल गीतांची  ” एव्हरग्रीन डुएटस् ” संगीत मैफल संपन्न…

[avatar]
सुरेल सुमधुर अविस्मरणीय हिंदी चित्रपट युगुल गीतांची  ” एव्हरग्रीन डुएटस् ” संगीत मैफल संपन्न…
 मुंबई प्रतिनिधी(लक्ष्मण राजे)
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात बरेच  दिवस घरात बसलेल्या संगीतप्रेमी रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी  डिजिटल प्लॅटफॉर्म वरुन सुरेल गाण्यांची संगीत मैफल आयोजित करण्याचा नवा ट्रेंड सुरू झाला आहे. त्याच अनुषंगाने  निर्माता, दिग्दर्शक , आणि गायक हेमंत पारेख यांच्या हार्मोनी हार्टस् प्रेझेंटस् ” एव्हरग्रीन डुएटस् ” या लोकप्रिय सुरेल हिंदी चित्रपट युगुल गीतांच्या मनोरंजक कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली होती.या शो मध्ये निर्माता हेमंत पारेख यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या  एका पेक्षा एक सरस, सुमधुर, सुरेल , अविस्मरणीय लोकप्रिय युगुल गीतांची  ” एव्हरग्रीन डुएटस् ” ही सुरेल संगीत मैफल  डिजिटल प्लॅटफॉर्म वरुन आॅनलाईन सादर करण्यात आली.निर्माता हेमंत पारेख यांच्या हार्मोनी हार्टस् प्रेझेंटस् तर्फे सादर केलेल्या अविस्मरणीय सुमधुर लोकप्रिय गाजलेल्या युगुल गीतांच्या “एव्हरग्रीन डुएटस् ” या आॅनलाईन कार्यक्रमात हेमंत पारेख आणि बाली पासाद या गायकांनी गाजलेली मधुर युगुल गीते सादर केली आणि रसिकांना मंत्रमुग्ध केले. या सुरेल संगीत मैफिलीचे सुत्रसंचलन , निवेदन हेमंत पारेख यांनी केले. या यशस्वी आॅनलाईन कार्यक्रमाला रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. विशेषतः भारतासह कॅनडा , मास्को , यूएसए , यूएई , यूके अशा जगभरातील हिंदी चित्रपट गीतांच्या चाहत्यांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. तसेच असंख्य रसिकांनी इव्हेंट आॅर्गनाईझर हेमंत पारेख यांच्या यू ट्यूब चॅनल वरून अनेकदा आनंद घेतला . या अविस्मरणीय कार्यक्रमाच्या अभूतपूर्व यशानंतर  हेमंत पारेख यांनी हार्मोनी हार्टस्
तर्फे डिजिटल प्लॅटफॉर्म वरुन विविध संकल्पना घेऊन  सुरेल हिंदी गाण्यांच्या मैफलीचे आयोजन करून रसिकांना घरबसल्या आनंददायी सुरेल , मधुर हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा देण्यासाठी हार्मोनी हार्टस् सदैव प्रयत्नशील राहील असे मनोगत व्यक्त केले .

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close