देव माणूस फेम अभिनेत्री ऐश्वर्या नागेशचा इकरा इंग्लीश मिडीयम संस्थेच्या वतीने  सत्कार…

[avatar]
देव माणूस फेम अभिनेत्री ऐश्वर्या नागेशचा इकरा इंग्लीश मिडीयम संस्थेच्या वतीने  सत्कार…
  मुंबई प्रतिनिधी(लक्ष्मण राजे )
 चिपळूणची सुकन्या इकरा इंग्लिश मिडीयम ची माजी विद्यार्थी ऐश्वर्या नागेश हिने झी मराठीवरील देव माणूस या मालिकेत अपर्णाची भूमिका कसदारपणे साकारली आहे. तिच्या अभिनयाचे कौतुक संस्थेच्या  वतीने चेअरमन अन्वर भाई पेचकर व महेर पेचकर यांनी तिला या क्षेत्रातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. या वेळी शहराध्यक्ष रतन पवार, युवा कार्यकर्ते फैसल पिलपिले ट्रस्टी जुल्फिकार पेचकर मजहर पेचकर सुमया पेचकर शाळे चे विद्यार्थी यांच्यासह ऐश्वर्याचे आई-वडील उपस्थित होते. झी मराठी वाहिनीवर सुरु असलेल्या ‘देव माणूस’ या मालिकेतून चिपळूणची सुकन्या, ऐश्वर्या अरुणा प्रकाश नागेश प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तिने या मालिकेत डॉक्टरच्या आयुष्यात येणारी नवीन व्यक्ती हे पात्र साकारल असून अपर्णा हे तिच्या भूमिकेचे नाव आहे. ८ ऑक्टोबर रोजी रात्री १०.३० वाजता तिचा पहिला एपिसोड प्रदर्शित झाला.   विद्यालायात तिचे शालेय शिक्षण पूर्ण झाले असून डी.बी.जे. महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी असलेल्या ऐश्वर्या नागेश हिने महाविद्यालयीन स्तरावरील एकांकिका तसेच मॉडेलिंग अशा विविध स्पर्धांमधून स्वतःला सिद्ध केले आहे. तिने वक्तृत्व, कथाकथन, चित्रकला, रांगोळी, अभिनय अशा विविध स्पर्धांमध्ये आजवर यश मिळवले आहे. एसटी महामंडळातील निवृत्त वाहतूक निरीक्षक प्रकाश नागेश यांची ती कन्या आहे. सध्या ती ए.एल.एस.जे. कॉलेज, कुर्ला येथे मास मीडियाचे शिक्षण घेत आहे. शाळेत असताना तिने सर्वोत्तम मानला जाणारा चतुरंगचा विद्यार्थी गोडबोले पुरस्कार मिळविला होता. यापूर्वी तिने अनेक एकांकिका, शॉर्ट फिल्ममधून अभिनय केला आहे. तसेच सह्याद्रीवरील ‘भ्रमंती महाराष्ट्राची’ या कार्यक्रमातही तिने निवेदन केले आहे. अनेक फॅशन शो जिंकले आहेत. ‘असंही घडू शकतं’ हे नाटकही तिने केले असून आता ती झी मराठीवरील ‘देव माणूस’ या मालिकेतून दिसत आहे. आपल्या यशामध्ये आई-वडिलांचा मोठा वाटा असल्याचे ऐश्वर्याने सत्कारावेळी सांगितले.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close