ड्रग्स मुळे बाॅलिवूड वादाच्या भोवर्‍यात अडकले असतानाच दिग्दर्शक योगेश पवार यांनी  ” द नशा डायरीज ” या वेब सिरीजचे केले दिग्दर्शन…

[avatar]
ड्रग्स मुळे बाॅलिवूड वादाच्या भोवर्‍यात अडकले असतानाच दिग्दर्शक योगेश पवार यांनी  ” द नशा डायरीज ” या वेब सिरीजचे केले दिग्दर्शन…
मुंबई प्रतिनिधी(लक्ष्मण राजे )
सध्या संपूर्ण बॉलिवूड ड्रग्स मुळे वादाच्या भोवर्‍यात अडकलेले असताना दिग्दर्शक योगेश पवार यांनी ” द नशा डायरीज ” या नावाने वेब सिरीज दिग्दर्शित केलेली आहे. या वेब सिरीज मध्ये कॉलेजची तरूणाई ड्रग्सच्या  जाळ्यात कशी अडकते, त्यातून बाहेर कशी पडू शकते, तसेच ड्रग्सचे सेवन केल्यास तुमच्यावर काय बिकट परिस्थिती येऊ शकते, या सगळ्याच गोष्टी अनुभवायला मिळतील. त्यासोबत वेब सिरीजला मनोरंजनाचा एक तडका सुद्धा त्यांनी दिला आहे. तसेच ” द नशा डायरीज ” या वेब सिरीजची निर्मिती चंद्रभागा फिल्म प्रोडक्शन्सने केली असून निर्माता म्हणून जीवन जाधव यांनी एक उत्तम विषय निवडला आहे. या वेब सिरीज मध्ये   योगेश पवार  , शिवराज वाळवेकर, हर्ष अय्यर  , शाष्वती खन्ना, वैभव पगारे , भाग्यश्री बडकस  आणि प्रशांत सिंग यांनी प्रमुख भूमिका उत्तम रित्या साकारल्या आहेत.
 निर्माते जीवन जाधव यांनी दिलेल्या माहिती नुसार ” द नशा डायरीज ” ही वेब सिरीज लवकरच प्रेक्षकांना “पिंग पोंग” ॲप वर बघायला मिळेल. दिग्दर्शक योगेश पवार यांच्या म्हणण्यानुसार नुसतीच एक मनोरंजन कथा करण्यापेक्षा जर त्यामधून आपण सामाजिक संदेश देऊ शकलो तर आपली आपल्या देशासाठी एक छोटीशी पण अत्यंत मोलांची सामाजिक बांधिलकीची भागीदारी असू शकते, त्यामुळे ड्रग ॲडिक्शन हा विषय त्यांनी निवडला आहे.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close