मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाची नाट्यगृहाचे भाडे २० ते २५ टक्के आकरण्याची श्री.शिवाजी मंदिर स्मारक ट्रस्टकडे मागणी…

[avatar]
मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाची नाट्यगृहाचे भाडे २० ते २५ टक्के आकरण्याची श्री.शिवाजी मंदिर स्मारक ट्रस्टकडे मागणी…
मुंबई प्रतिनिधी(लक्ष्मण राजे ) महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. उध्दवजी ठाकरे यांनी राज्यातील नाट्यगृहे , नाट्य प्रयोगांसाठी कोरोना सुरक्षा नियामावलीच्या अंतर्गत राहून खुली करण्याचा निर्णय ५ नोव्हेंबर २०२० रोजी जाहीर केला. परंतु  कोरोना काळात मराठी नाट्य निर्मात्यांचे आर्थिक बजेट कोलमडले असून, व्यावसायिक नाट्यप्रयोगासाठी दादर येथील श्री. शिवाजी मंदिर  नाट्यगृहाचे भाडे फक्त २० ते २५ टक्के आकारून ७० ते ७५ टक्के सवलत द्यावी, अशी मागणी मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाने श्री शिवाजी मंदिर स्मारक ट्रस्टकडे  निवेदनाद्वारे केली आहे. मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दादर येथील श्री शिवाजी मंदिर स्मारक ट्रस्टच्या संचालक मंडळाकडे निवेदन सादर केले.याप्रसंगी मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाचे अध्यक्ष श्री. संतोष काणेकर, उपाध्यक्ष ज्ञानेश महाराव, प्रमुख कार्यवाह राहुल भंडारे आदी मान्यवर उपस्थित होते. मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाने दिलेल्या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे यांनी राज्यातील नाट्यगृहे नाट्यप्रयोगांसाठी कोरोना सुरक्षा नियमावलीच्या अंतर्गत राहून खुली करण्याचा निर्णय ०५ नोव्हेंबर २०२० रोजी जाहीर केला. तथापि, पूर्वीच्या हिमतीने नाट्यप्रयोग लावण्याची शक्ती नाट्यनिर्मात्यांमध्ये आता राहिली नसल्याचे त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.टाळेबंदीच्या काळात  नाट्यनिर्माता  यांना आपल्या नाटकाचे प्रयोग व नवीन नाट्य निर्मितीची तयारी थांबवावी लागली,त्याचा मोठा फटका नाट्य निर्मात्यांना बसला असल्याचे नमूद केले आहे.तरीही नाट्यनिर्माते नाट्य व्यवसाय नव्याने सुरू करण्याची हिंमत बाळगून आहे.यासाठी नाट्य निर्मात्यांना शासनाच्या सहकार्याची आणि आर्थिक साह्याची गरज आहे, ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन दादर येथील श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहाचे व्यावसायिक नाट्यप्रयोगासाठीचे भाडे ७० ते ७५ टक्के माफ करून फक्त २० ते २५ टक्केच करावे,अशी मागणी मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाने श्री शिवाजी मंदिर स्मारक ट्रस्टकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close