धक्कादायक बातमी:जेष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नांत डाॅ.शीतल आमटे यांची आत्महत्या…

[avatar]

धक्कादायक बातमी:जेष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नांत डाॅ.शीतल आमटे यांची आत्महत्या…

 चंद्रपूर : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ.शीतल आमटे-करजगी यांनी आज (30 नोव्हेंबर)आत्महत्या केली आहे. झोपेच्या गोळ्यांचा जादा डोस घेऊन त्यांनी आयुष्य संपवल्याचा अंदाज आहे.
काही दिवसांपूर्वी डॉ. शीतल आमटे यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करुन महारोगी सेवा समितीच्या कार्यकर्त्यांवर, विश्वस्तांवर केलेल्या आरोपांमुळे खळबळ उडाली होती. परंतु दबावामुळे त्यांनी एक दोन तासात हा व्हिडीओ हटवला.
यानंतर डॉ. विकास आमटे, प्रकाश आमटे, मंदा आमटे आणि भारती आमटे यांनी पत्र काढून त्यांचे आरोप फेटाळले होते. त्यांची मानसिक आरोग्य फारचं ठीक नसून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं होते.
वरोरा उपजिल्हा रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना मृत घोषित केले. डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. नातेसंबंध आणि महारोगी सेवा समितीमधील कलहाचा त्रास सहन न झाल्याने त्यांनी आत्महत्या केली असावी असंही सांगितलं जात आहे.
डॉ. शीतल आमटे या ज्येष्ठ समाजसेवक स्वर्गीय. बाबा आमटे यांच्या नात होत्या. शीतल आमटे सध्या आनंदवनची संपूर्ण जबाबदारी सांभाळत होत्या. आज त्यांनी आत्महत्या केल्यानं सर्वांना धक्का बसला आहे.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close