राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र नागपूर तरूण भारतचे माजी मुख्य संपादक माधव गोविंद वैद्य यांचे निधन…

[avatar]

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र नागपूर तरूण भारतचे माजी मुख्य संपादक माधव गोविंद वैद्य यांचे निधन…

मुंबई प्रतिनिधी(लक्ष्मण राजे )नागपूर तरूण भारतचे माजी मुख्य संपादक आणि भाष्य हा स्तंभ लिहिणारे माधव गोविंद वैद्य यांचे वयाच्या ९७ व्या वर्षी वार्धक्याने निधन झाले. मा‌. गों. उर्फ बाबूराव वैद्य यांची भाष्य हा स्तंभ नियमित लिहिणारी लेखणी अखेर थबकली! एक ज्येष्ठ मार्गदर्शक , संस्कृत भाषेचे अगाध ज्ञान , मराठी भाषा , आणि व्याकरणा वरील सिद्ध हस्त लेखक अशी कितीतरी बिरूदं अपुरी पडतील इतकं अथांग व्यक्तीमत्व म्हणून त्यांच्याकडे समाज पहात असे. केवळ जनसेवा आणि संघ सेवाच नव्हे तर संघ विचार रूजविण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले, त्यासाठी अनेक हाल अपेष्टा सहन केल्या. असे प्रतिभावान विचारवंत माधव गोविंद वैद्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेलं तरुण भारत हे वृत्तपत्र अस्तित्वात आल्यापासून अगदी अगदी परवा परवा भाष्य हा आपला शेवटचा स्तंभ लिहिपर्यंत मा. गों.वैद्य आणि तरुण भारत हे अविभाज्य घटक होते.तसेच संघाच्या सांगण्यानुसार हिसलॉप कॉलेजमधील संस्कृत या विषयाची प्राध्यापकी सोडून ते स्व. ग त्र्यं माडखोलकर यांच्या हाताखाली कार्यकारी संपादक म्हणून आले.पण त्यावेळपासूनच त्यांच्याकडे भावी संपादक म्हणून पाहिले जात होते. तरुण भारत मधून रिटायर झाल्यानंतर  ते संघाचे पाहिले प्रवक्ते बनले! सर्व टीव्ही चॅनेल्सवर संघाची काळी टोपी घालून आपली वैचारिक बैठक दाखवणारे! वैद्यांचा दरारा संघ परिवारात इतका मोठा होता की स्व.बाळासाहेब देवरस यांच्या नंतरच्या प्रत्येक सरसंघचालकाच्या नियुक्तीत इतकंच कशाला भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या अध्यक्ष म्हणून निवड करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती.१९७८ते ८४ या काळात विधान परिषदेवर नामनियुक्त आमदार म्हणून काम करणार्या माधव गोविंद वैद्य यांची अतिरेकी उजवी विचारसरणी, हिंदुत्वाचा पुरस्कार हे  डाव्या मध्यममार्गी वैचारिकतेकडे झुकलेल्या कोणत्याही  व्यक्तीला पटण शक्यच नव्हतं.पण तरीही जेव्हा विदर्भात केवळ दोन मोठी वृत्तपत्र निघत होती, तेव्हा माधव गोविंद वैद्य यांच्या वैचारिकतेचा मागोवा घ्यावाच लागायचा. आपल्या स्तंभातून वंशपरंपरा आणि भ्रष्टाचार यावर टीका करणाऱ्या वैद्यांना त्याच प्रकारच्या टिकेला तोंड द्यावं लागलं जेव्हा त्यांच्या मुलाला अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात पेट्रोल पंप देण्यात आला.मुलाचा व्यवहार वेगळा आहे, हे त्यांचं उत्तर तितका समर्थनीय वाटत नव्हतं. टीकेची झोड उठल्यानंतर त्यांच्या मुलानं श्रीनिवासनी पेट्रोल पम्प परत केला. २०१० साली नितीन गडकरींना अध्यक्ष करण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची होती.मात्र २०१३ साली गडकरी यांच्या विरोधात आणि पूर्ती या त्यांच्या कम्पनी च्या विरोधात एका वृत्तपत्र समूहात जेव्हा सतत बातम्या येऊ लागल्या तेव्हा चिडलेल्या मागोंनी त्या बातम्या मागे तेव्हाचे गुजरातचे मुख्यमंत्री आणि सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्याचा आरोप आपल्या भाष्य या स्तंभात केला. डॅमेज कंट्रोल करायला स्वतः गडकरींना आणि संघात उच्च पदावर कार्यरत असलेल्या त्यांच्या मुलाला मनमोहन वैद्यना पत्रकार परिषद घेऊन  यात तथ्य नसल्याचं सांगावं लागलं. किंवा मोदींच्या दबावाखाली त्यांनी तसे सांगितले. उजव्या विचारसरणीच्या व्यक्तींमध्ये असलेली कमालीची मतभिन्नता पुढे आली!अर्थात एकांगी उजव्या विचाराचे असले तरीही ते पत्रकार होते. त्यांच्या निधनाने देश एका निर्भिड ज्येष्ठ पत्रकार आणि निष्ठावान परखड स्वयंसेवकाला मुकला आहे. राजकीय आणि पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.त्यांच्या जाण्याने संघ परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शोककळा पसरली आहे. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने माधव गोविंद वैद्य यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close