मुंबईतील परेल येथील  पहिले दामोदर नाट्य गृह सुरू…

[avatar]

मुंबईतील परेल येथील  पहिले दामोदर नाट्य गृह सुरू…

 मुंबई प्रतिनिधी(लक्ष्मण राजे )सुमारे ९ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मुंबईतील परेल येथील दामोदर नाट्यगृह   शुक्रवार दिनांक २५ डिसेंबर २०२० रोजी  (नाताळ सुट्टी ) दुपारी ४ वाजता सुरू होत आहे. २३सप्टेंबर २०२० रोजी मुंबईत तुफान पाऊस पडला आणि परेल येथील दामोदर हॉल मध्ये पाणी भरले होते आणि खूप नुकसान झाले होते, तरीही दामोदर हॉलचे संचालक मंडळ आणि दामोदर हॉलची पूर्ण आजी माजी व्यवस्थपक टीम यांनी ताबडतोब युद्ध पातळीवरकाम करून दामोदर नाट्यगृह व्यवस्थितपणे तयार करून सरकारच्या आदेशाची वाट पाहत बसले होते. मुबंई सोडून मुंबई बाहेरची नाट्यगृह सुरू झाली आहेत. पण आपल्या महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत मात्र अद्याप नाट्यगृह सुरू झाली नाहीत याची रंगकर्मीनां खंत वाटत होती. तसेच
ह्या बाबतीत खूप वाईट वाटलं आणि मुंबईतील अनेक नाट्यगृहांपैकी एक तरी नाट्यगृह नाटक पहाण्यासाठी प्रतिक्षेत असलेल्या असंख्य सन्माननीय मायबाप रसिक प्रेक्षकांसाठी सुरू झाले पाहिजे.असा ठाम विश्वास घेऊन नाट्य क्षेत्रातील बुकिंग क्लार्क, आणि व्यवस्थापक संघाचे सचिव हरी पाटणकर यांनी परेल येथील दामोदर नाट्यगृह सुरू व्हावे म्हणून आजी माजी व्यवस्थापक बाबू राणे, पाटील आणि दामोदर नाट्यगृहाच्या दि सोशल सर्व्हिस लिंग या संस्थेचे संचालक माननीय श्री.आनंद माईणकर , अध्यक्ष श्री. विजय वर्टी , उपाध्यक्ष श्री.चंद्रकांत खोपडे , सचिव यांच्या बरोबरचर्चा करून दामोदर नाट्यगृह
रसिक प्रेक्षकांसाठी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या सर्व मान्यवर संचालकांचे व्यवस्थापक आणि बुकिंग क्लार्क संघाचे सचिव हरी पाटणकर यांनी आभार मानले. मुबंई मधील परेल येथील पाहिले दामोदर
नाटयगृह महाराष्ट्र सरकारने दिलेली नियमावली पाळून सुरू होत आहे. अनेक मान्यवर आणि रसिकांच्या  उपस्थित दामोदर नाट्यगृह सुरू होत असल्याने नाट्य क्षेत्रातील अनेक निर्माते,कलाकार , व्यवस्थापक , बुकिंग क्लार्क , रंगमंच कामगार , आणि असंख्य मायबाप रसिक प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे.अशी माहिती व्यवस्थापक आणि बुकिंग क्लार्क संघाचे सचिव हरी पाटणकर यांनी दिली.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close