कार्याध्यक्ष पदापेक्षा माझ्यासाठी जनता आणि कार्यकर्ता महत्वाचा :- आमदार प्रणिती शिंदे…

[avatar]
कार्याध्यक्ष पदापेक्षा माझ्यासाठी जनता आणि कार्यकर्ता महत्वाचा :- आमदार प्रणिती शिंदे…
सोलापूर(विशेष प्रतिनिधी) महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या कार्याध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सोलापूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने माननीय आमदार प्रणिती शिंदे यांचा भव्य सत्कार काँग्रेस भवन सोलापूर येथे शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या हस्ते , जिल्हा अध्यक्ष प्रकाश पाटील, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, माजी आमदार धनाजी साठे, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, अरुण शर्मा, यांच्यासह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.यावेळी क्रेन ने हार घालून, प्रणिती शिंदे यांच्या वर गुलाब पाकळ्यांचा वर्षाव करुन काँग्रेस भवनात आमदार प्रणिती शिंदे यांचे भव्यदिव्य स्वागत करण्यात आले.यावेळी बोलताना नवनियुक्त प्रदेश कार्याध्यक्ष,आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की आपल्या सर्वांच्या सहकार्या मुळे, आणि आशीर्वादा मुळे, काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनियाजी गांधी, खासदार राहुलजी गांधी यांच्यामुळे मला प्रदेश कार्याध्यक्ष पदाची संधी मिळाली. तसेच मला पहिल्यांदाच पक्षाची मोट्ठी जबाबदारी मिळाली आहे. मला संघटना चालवायचा जास्त अनुभव नाही. पण आपल्या सारख्या अनुभवी ज्येष्ठ मंडळी कडून सल्ला घेऊन काम करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मा. सुशीलकुमार शिंदे साहेबांनी ज्या निष्ठने आज पर्यंत पक्षाचे काम
 केले. कार्यकर्त्याला ताकद देण्याचे काम केले. त्यांच्याच पावलावर पाउल ठेवून मी काम करेन. कार्यकर्त्यामुळे आम्ही आहोत म्हणुन मला काँग्रेस कार्याध्यक्ष पदापेक्षा जनता आणि कार्यकर्ता महत्वाचा वाटतो. मी कुठे चुकत असेल तर मला जरूर सांगा. आम्ही सदैव तुमच्या सेवेसाठी आहोत.
पुढे बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या की काल मुंबईत आगळ्या वेगळ्या पद्धतीने जनतेच्या प्रश्नांना वाचा फोड़त, नवनियुक्त अध्यक्ष नाना पटोले व पदाधिकाऱ्यांनी पदभार घेतला. आणि मोदी सरकार चले जाव चा नारा दिला. तसेच मोदी सरकार आल्यापासुन शेतकऱ्यांवर होत असलेला अन्याय, महिला अत्याचार, दीन दलित मागासवर्गीय यांच्यावर होणाऱ्या अन्याया विरुध्द आवाज उठवून हा देश भाजप मुक्त करायचा आहे. मोदी हटाव-देश बचाव, मजबूत कार्यकर्ता मजबूत देश हे आपण सोलापुर पासुन सुरूवात करूया , आणि घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली लोकशाही मजबूत करण्यासाठी मी काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष पद स्वीकारत आहे. असे मनोगत आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केले.या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला आजी माजी नगरसेवक , नगरसेविका, नगराध्यक्ष, तालुका अध्यक्ष, माजी महापौर, प्रवक्ते, ब्लॉक फ्रंटल सेल पदाधिकारी, शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी, आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close