प्रामाणिक बेकरी मजूर श्री हनिफ शेख सफाळे पोलिस स्टेशनचे अधिकारी संदीप कहाळे यांच्या हस्ते सन्मानित…

[avatar]
प्रामाणिक बेकरी मजूर श्री हनिफ शेख सफाळे पोलिस स्टेशनचे अधिकारी संदीप कहाळे यांच्या हस्ते सन्मानित…
मुंबई(प्रतिनिधी)सफाळे:-  आज कालच्या धावपळीच्या युगात प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या कामासाठी धावपळ करीत असते , अश्यावेळी त्याची एखादी वस्तु पडते , हरवते हे त्याला त्याच वेळी समजते जेव्हा त्या वस्तुची आठवण येते व तो सर्व ठिकाणी शोधाशोध करतो परंतु हरवलेली वस्तू , पैसा, दुसर्‍या व्यक्तीला मिळालेला असतो. अशी सापडलेली वस्तू , पैसा परत देणारा हजारात एखादा माणूस मिळतो. सफाळे पोलीस स्टेशन परिसरात न्यू भारत बेकरी, सफाळे पूर्व, मध्ये काम करणारे मजूर श्री. हनिफ शेख हे हजारातील एक असून, त्यांना सफाळे येथील रिक्षाचालक मोहन ठक्या पाटील रा. नंदाडे यांचे रोख रक्कम ४५००/- आणि रुपये महत्वाची कागदपत्रे असलेले पाकीट मिळाले असताना त्यांनी अगदी निस्वार्थीपणे ट्रॅफिक पोलिस श्री.नांगरे साहेब यांच्याकडे नेऊन दिले. पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी श्री. संदीप कहाळे यांनी मोहन पाटील यांना त्यांचे पाकीट परत केले. तसेच स्वार्थी आणि मतलबी लोकांनी भरलेल्या जनतेच्या गर्दीमध्ये पैसे मिळाले असताना अगदी निस्वार्थीपणे पोलिस स्टेशन पर्यंत पोहचविणारे प्रामाणिक असणारे श्री. हनीफ शेख यांचा पोलिस स्टेशन मधे बोलवून शाल, श्रीफळ देऊन स्वहस्ते, व आपल्या कर्मचारी वर्गातर्फे  सत्कार केला, आणि त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे केलेल्या कार्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक त्रिवार अभिनंदन केले.अशी माहिती हिरालाल लोखंडे यांनी दिली.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close