हास्यसम्राट स्व.कमलाकर वैशंपायन स्मृती राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धेस उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला…

[avatar]

हास्यसम्राट स्व.कमलाकर वैशंपायन स्मृती राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धेस उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला.
पनवेल (विशेष प्रतिनीधी)

हास्यम्राट स्व.कमलाकर वैशंपायन स्मृती राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धेस उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला. 57 स्पर्धक महाराष्ट्राच्या विविध भागातुन सदरहु स्पर्धेत सहभागी झालेले होते. अगदी चिमुकल्या पासुन ते जेष्ठ नागरीकांनी एकपात्री अभिनयाच्या माध्यमातुन अनेक विषयाला स्पर्श केला. सभागृह तुडुंब भरलेले होते..स्पर्धेचे परिक्षण रंगभूमी कलाकार श्री.जंयत ओक , नाट्य लेखक व दिग्दर्शक श्री.मनोहर लिमये व सिने अभिनेत्री पूजा पोळ यांनी अत्यंत उत्तमरीत्या केले. राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन संस्थापक श्री.एन,डी.खान,प्राचार्य डाॕ. सौ. रमा भोसले , सौ.सलमा खान व श्री.राजकुमार ताकमोगे यांनी केले. जेष्ठ अभिनेत्री मेघना साने , सिने टी.व्ही. अभिनेत्री नयन पवार , विशेष उपस्थितीत पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी हास्यसम्राट स्व . कमलाकर वैशंपायन यांचे मोठे बंधू श्री. दिवाकर वैशंपायन व चिरंजीव श्री. वैभव वैशंपायन, शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्रा.डाॕ. निलिमा मोरे ,श्रीम.इन्दुमत्ती ठक्कर, सौ.मंगला बिराजदार डाॕ.मुन्नव्वर सुलताना,, श्रीम.चित्रा भगत ,अब्दुल समद मुकादम, श्री.शैलेश अक्कलकोटे व झाकीर पालेकर हेआवर्जुन उपस्थित होते. सर्व स्पर्धकांनी एकापेक्षा एक सरस अभिनय सादर करुन स्व. कमलाकर वैशंपायन यांच्या सारख्या हरहुन्नरी कलाकाराला जणू श्रध्दांजली अर्पण केली.                                                                             अत्यंत अटीतटीच्या स्पर्धेत कल्याणी भागवत , विल्सन खराडे व सोनम व्यवाहारे यांनी अनुक्रमे प्रथम क्रमांक, द्वीतीय क्रमांक व तृतीय क्रमांक पटकवला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सिने व टि.व्ही कलाकार श्रीम.शुंभागीनी पाटील ,श्री.दीपक कदम, श्रीम.रेहाना तांबोळी आणि एच.एन.पाटील यांनी उत्कृष्टपणे केले केले . याप्रसंगी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बहुमुल्य योगदान देणारे डाॕ.रोहन कदम, श्री.भगवान बडगुजर , श्री.पी.एल.गायकवाड , फीरोज सय्यद , श्री.सुदेश दळवी , सौ.नाझनिन पालेकर व सौ.नमिता राणे यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
सौ. मीना ताकमोगे, .निजाम शेख ,श्रीम. वर्षा पाचभाई , सौ.छाया अक्कलकोटे , अस्लम नाईक व शासकीय अध्यापक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा यशस्विकरिता परिश्रम घेतले.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close