राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात आमदार भरतशेठ गोगावलेंची गाडी फोडली…

[avatar]

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात आमदार भरतशेठ गोगावलेंची गाडी फोडली…

रोहा/प्रतिनिधी-आज रोजी सुतारवाडी येथील ग्रीन ब्लॉसम रिसॉर्ट येथे आमदार भरतशेठ गोगावले यांची गाडी फोडण्यात आली. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात झालेल्या या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे. 150 ते 200 जणांच्या जमावाने हा हल्ला केल्याचे बोलले जात आहे. एवढया मोठया प्रमाणात हल्ला होण्याची ही रोहा तालुक्यातील पहिलीच घटना आहे. या प्रकारामुळे सुतारवाडीतील वातावरण तंग झाले असून या ठिकाणी रायगड दंगल नियंत्रण पथक तैनात केले आहे.
भिरा फाटा ते सुतारवाडी पर्यंत 8 किलोमीटर परिसरात हा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यावरुन या घटनेचे गांभीर्य लक्षात येते. सदर घटना कशामुळे व का घडली हे समजू शकले नसले तरी पास्को येथील भंगार उचलण्यावरुन हा वाद शिगेला पोहोचला असल्याची चर्चा सुरु आहे. या हल्ल्यामध्ये आमदार भरतशेठ गोगावले यांचे पुत्र युवा सेना जिल्हाधिकारी विकास गोगावले व राष्ट्रवादी नेते बाबू खानविलकर हे गंभीररित्या जखमी झाले असल्याचे समजते. तसेच या वादामध्ये पास्को कंपनीच्या गाडया व खाजगी वाहने मिळून 30 ते 40 वाहनांचे नुकसान झाले असल्याचे वृत्त आहे.पास्को कंपनीच्या कॉईन वाहून नेणार्‍या गाडीवरील वाहनचालकास मारहाण झाली. हा चालक येथील स्थानिक असल्यामुळे गावात ही बातमी पसरताच 150 ते 200 ग्रामस्थ याचा बदला घेण्यासाठी सुतारवाडी येथील ग्रीन ब्लॉसम या रिसोर्टवर धडकले आणि त्यांना कोणताही विचार न करता येथे असलेल्या गाडया फोडण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे येथे उपस्थित असलेल्या राष्ट्रवादी व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना काही समजलेच नाही. जमावाने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. आता पोलीस या प्रकरणी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close