छ्त्रपती शिव शाहू महाराज सामाजिक संघटना सोलापूर जिल्हा सांस्कृतिक तथा साहित्य विभाग प्रमुख म्हणून कवी तुषार गुळीग यांची निवड…

[avatar]

छ्त्रपती शिव शाहू महाराज सामाजिक संघटना सोलापूर जिल्हा सांस्कृतिक तथा साहित्य विभाग प्रमुख म्हणून कवी तुषार गुळीग यांची निवड…

सोलापूर:(विशेष प्रतिनिधी)नेहमीच सामजिक व सांस्कृतिक कार्यात अग्रेसर असणारे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात असणाऱ्या गौडवाडी गावातील मधील प्रसिद्ध लेखक तथा युवा कवी व पद्मभूषण वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजि या कॉलेज चे विद्यार्थी युवा कवी.तुषार गुळीग यांची संघटनेचे राज्य अध्यक्ष महेश तळेकर व राज्य सचिव अविनाश गिरे यांनी सोलापूर जिल्हा सांस्कृतिक विभाग तथा साहित्य विभाग प्रमुख पदी निवड केली.
तुषार गुळीग हे उत्तम वास्तववादी कवी व लेखक आहेत.तसेच संभाजी ब्रिगेड एक वादळ आयोजित राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धेतही दुसरा क्रमांक मिळवला आहे.तसेच त्याच्या स्वराज्य, छावा, भिमराय,भिकारी,नारी,मैत्री,फौजि,मृत्यु,वृक्ष प्रेम,आजचा तरुण,नाती,माय मराठी,पाणी म्हणजे जीवन,गावाकडचे खेळ,अश्या अनेक कविता महाराष्ट्रभर आणि सोसिल मिडियावरती अनेक चाहत्यांना भुरळ घालतात.समाजात सत्य परिस्तिवर असणारं परखड लेखन आणि वास्तववादी लेखन ही त्याची खास ओळख आहे. आपल्या सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते मा.आ. गणपतरावजी देशमुख, मा.उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री स्वर्गीय.आर आर पाटील,भाजपा स्टार प्रचारक गोपीचंद पडळकर, तसेच समाजसेविका सिंधुताई सपकाळ व महाराष्ट्रातील लोकप्रिय तमाशा कलावंत मंगला बनसोडे अश्या अनेक दिगज्यावर्ती लिहिलेल्या आणि सामाजिक विषयावर लिहिलेल्या कविता तितक्याच प्रसिद्ध आहे. सद्याच्या कोरोनाच्या या परिस्तिथीवरही भाष्य करणाऱ्या कोरोना,कोरोना रोकोना, तसेच “देव कुठे गेला” या ही कविता लोकांना विचार करायला भाग पाडणाऱ्या आहेत.तसेच त्याने सोबत महाराष्ट्रातील विविध भागातील युवा कवी, कवयित्री एकत्र करून त्यांना मार्गदर्शन आणि साहित्याची आवड निर्माण व्हावी आणि त्यांनी ही लेखन क्षेत्रात यावं यासाठी त्याने “सन्मान साहित्याचा जेष्ठ,युवा कवी, कवयित्री ,लेखक-वाचक समूह महाराष्ट्र राज्य” या समूहाची निर्मिती करून सर्वाना जेष्ठ कवी,कवयित्री, लेखक यांच्याकडून मार्गदर्शन देत आहे. तसेच समुहाच्या सहप्रशासिका शशिकला गुंजाळ ह्या आहेत व समूहातील ग्राफिक्स चे कामकाज सौरभ आहेर, दिपाली धुमाळे, वैष्णवी भोसले, चैतन्य पारसे, किरण जावीर, दिपाली मारोटकर,गुड्डाराज नामदास ,श्वेता उदमले,जयेश उगले,दिनेश करांडे, सायली मोरे,संयम पाटील,समीर ईखा,व पत्रकार प्रियांका पवार आणि  पत्रकार खंडू भोसले सर याचे नेहमी सहकार्य असते.युवा कवी.तुषार गुळीग हे  सांस्कृतिक कार्यातही नेहमीच अग्रेसर असतात,सध्या ते संगणक अभियांत्रिकी (माहिती तंत्रज्ञान) या विभागात तृतीय वर्षात शिक्षण घेत आहेत,त्यांच्या या निवडीबद्दल संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष संग्राम सलगर,गणेश आवताडे,अजित चव्हाण,आकाश कोल्हे,सुहास गाडे,केशव नाचविणेकर यांनी त्यांचे अभिनंदन केले.तसेच सन्मान साहित्याचा महाराष्ट्र राज्य या कवी कवयित्री परिवाराच्या वतीने व सर्व गौडवाडी ग्रामस्तानी अभिनंदन केले आणि सांगोला तालुक्यातील सर्व स्तरावरून त्याच कौतुक होत आहे.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close