कोरोना लॉकडाउनच्या कठीण काळात पत्रकारांना रोहित शेट्टी आणि जैकी श्रॉफ यांचा एक हात मदतीचा…

[avatar]

कोरोना लॉकडाउनच्या कठीण काळात पत्रकारांना रोहित शेट्टी आणि जैकी श्रॉफ यांचा एक हात मदतीचा…

 मुंबई प्रतिनिधी (लक्ष्मण राजे)कोरोना महामारी मुळे लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. लोकांच्या जीवावर बेतलेल्या या जीवघेण्या कोरोना वायरस पासून बचाव करण्यासाठी लोकांच्या जीवनाच्या सुरक्षिततेसाठी सरकार ने लॉकडाउन करून कडक निर्बंध घातले आहेत. त्यामुळे कोरोना महामारीच्या संक्रमणाचा होणारा फैलाव थोपविण्यात येईल.गेल्या वर्षी झालेल्या परिस्थिती पेक्षा या वर्षी परिस्थिती खूपच गंभीर आणि भयानक आहे.ज्या मुळे लोक मृत्युमुखी पडले आहेत.त्या बरोबरच उपाय योजना सुविधा ही कमी पडत आहेत.यामुळे गेल्या वर्षी पेक्षा या वर्षी जास्त लोकांचे व्यवसायही बंद झाले.सर्वांंची आर्थिक स्थिती बिकट झाली. विशेषत: मजुर स्वतंत्र पत्रकार , लहान मोठे व्यापारी, आणि खाजगी कंपन्यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही मोठा आर्थिक फटका बसला त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.जे आपलं गाव सोडून कामधंदा करून जीवन गुजराण करण्यासाठी शहरात आले आहेत त्यांची परिस्थिती अत्यंत वाईट झाली आहे.सरकारी मदत पण त्यांच्या पर्यंत पोहचू शकत नाही.अशा परिस्थितीत काही विशेष वर्गातील लोकांनी केलेली मदत त्यांना आशादायी वाटते. त्यात काही सेवाभावी मोठे फिल्म स्टार ही लोकांची मदत करीत आहेत. बॉलीवुड मधील मोठे नामांकित सुप्रसिद्ध दिग्गज अभिनेते जैकी श्रॉफ यांनी स्वतंत्र पत्रकारांसाठी एक हात मदतीचा दिला आहे. गेल्या वर्षी झालेल्या लाॅकडाऊन पासूनच जैकी श्राॅफ यांनी पत्रकारांसाठी अन्नधान्य रेशन वितरण केले आहे. तसेच चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी पण पत्रकारांना मोठ्या प्रमाणात मदत केली आहे. याचे उदाहरण म्हणजे बॉलीवुड मध्ये गेल्या तीस वर्षापासून वार्ताकंन करणारे सिने पत्रकार जॉनी वाज़ कोविड 19 महामारीच्या संसर्गामुळे चिंतेत होते.त्यांच्या संपर्कात काही असे पत्रकार होते की त्यांना सिने पत्रकार जाॅनी वाज यांची कोरोनामुळे झालेली दुर्दशा माहित होती.पण यावेळी सर्वांची आर्थिक परिस्थिती बिकट होती म्हणून मदत करण्यासाठी कमी पडले. ते असाह्य होते.जाॅनी वाज यांच्या संपर्कात असणाऱ्या काही पत्रकारांनी साऱ्यांनी मिळून बाॅलिवूड मधील निर्माते दिग्दर्शक मोठ्या सेलिब्रिटी कलाकारां सहीत फिल्म असोसिएशनला पत्रकारांच्या हालाखीची संपूर्ण माहिती दिली.तेव्हा त्यांच्या मदतीला सर्व प्रथम जैकी श्राॅफ आणि रोहित शेट्टी धावून आले आणि त्यांनी तातडीने पत्रकारांना सर्वोतोपरी मदत केली.पत्रकारांना मदत मिळाल्यावर त्यांनी जैकी श्राॅफ आणि रोहित शेट्टी यांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि अभिनेते अक्षय कुमार यांचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट  गेल्या वर्षी प्रदर्शित करण्यात येणार होता.  परंतु कोरोना महामारी पार्श्वभूमीवरील लाॅकडाऊनमुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती.तसेच पुढील काळात संपूर्ण देशात कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घातले होते म्हणून पुन्हा या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख  टाळाण्यात आली. त्याच रोहित शेट्टीच्या सुर्यवंशी सिनेमा मध्ये अक्षय कुमार आणि कैटरीना कैफ प्रमुख भूमिकेत आहेत.तसेच रणवीर सिंह ‘सिम्बा’ आणि अजय देवगण ‘सिंघम’ च्या भूमिकेत दिसणार आहेत.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close