झी मराठी वाहिनीवरील” अग्ग बाई सुनबाई” या मालिकेचा जाहीर निषेध ! – गणेश हिरवे…

[avatar]

झी मराठी वाहिनीवरील” अग्ग बाई सुनबाई” या मालिकेचा जाहीर निषेध ! – गणेश हिरवे…

मुंबई (लक्ष्मण राजे)मुंबई:- झी मराठी वाहिनीवर शुभदा आयरे व शेखर ढवळीकर लिखित, तसेच सुनील भोसले निर्मित “अग्ग बाई सुनबाई” या मालिकेतील गुरुवार दिनांक २०/०५/२०२१ रोजी रात्री ८-३० वाजता नियमित पणे प्रसारीत होत असलेल्या एपिसोड पुर्वी मालिकेतील सोहम ही महत्वाची व्यक्ती रेखा साकारत असलेले अभिनेते “अद्वैत दादरकर” यांनी समस्त शिंपी समाजाचे उपजीवीकेचे साधन असलेल्या व पुजनीय असलेल्या शिलाई मशीनला लाथ मारून समस्त शिंपी समाजाचा व शिंपी समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांचा घोर अपमान केला आहे.खरतर कोणत्याही उपकणाला असं लाथाडन हा खूप किळसवाणा प्रकार आहे.उपकरण मग ते कोणत्याही व्यवसायाशी निगडित असो,ते त्या त्या समाजाचे उपजीविकेचे प्रमुख साधन असते व या साधनांची दैनंदिन पूजा करण्यात येते.मग अभिनेते अद्वैत दादरकर यांनी अशा साधनांचा लाथ मारून केलेला अपमान समस्त शिंपी समाज व जे जे लोक शिलाईकाम करून आपली रोजीरोटी कमवित आहेत, त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. ज्यावेळी या भागाचे चित्रीकरण झाले तेंव्हा अभिनेते अद्वैत दादरकर यांनी शिलाई मशीनला लाथ मारण्याच्या प्रसंगाला विरोध दर्शविला असता तर तो त्यांचा मोठेपणा ठरला असता, पण पैशापुढे सर्व दुय्यम आहे हेच त्यांनी दाखवून दिले.तेव्हा मालिकेचा व चॅनेलचा टीआरपी वाढविण्यासाठी निर्माते व दिग्दर्शक अशी अपमानास्पद दृश्य दाखवीत असतील तर कोणताही समाज हे खपवून घेणार नाही.तेव्हा दुसऱ्याची बेअब्रू करून स्वतःची प्रतिष्ठा कोणीही जपू शकत नाही.या घटनेचा नामदेव समाजोन्नती परिषदेच्या वतीने जाहीर निषेध केला आहे. यास्तव मालिकेतील हा भाग व प्रोमो ताबडतोब काढून टाकावा व संबंधित सर्व अधिकारी व मालिकेतील कलाकारांनी जाहीर माफी मागावी.अशी मागणी नामदेव समाजोन्नती परिषद चे प्रवक्ते गणेश हिरवे यांनी केली आहे.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close