नियमांचे उल्लंघन पडले महागात टायगर श्रॉफ व दिशा पाटणी विरोधात गुन्हा दाखल…

[avatar]

नियमांचे उल्लंघन पडले महागात टायगर श्रॉफ व दिशा पाटणी विरोधात गुन्हा दाखल…

मुंबई (प्रवीण रा. रसाळ)देशात तसे राज्यात कोरोनाने हाहाकार माजवला असल्याने सरकारने अनेक कडक नियमांच्या अंतर्गत अनलॉकडाऊन करण्याचे योजिले असले तरी अजून ही नियम शिथिल केलेले नाहीत परंतु “अनलॉकडाऊनला सुरवात” या एका वाक्याचा फायदा घेत अनेक जण घराबाहेर पडताना दिसत आहेत, असाच काहीसा प्रकार अभिनेता टायगर श्रॉफ व अभिनेत्री दिशा पाटणी यांना भोवला असून सार्वजनिक ठिकाणी फिरून साथीच्या आजाराचे नियमभंग केल्याप्रकरणी अभिनेता टायगर श्रॉफ व अभिनेत्री दिशा पाटणी व त्यांच्या ड्रायव्हरच्या विरोधात कलम १८८, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टायगर श्रॉफ हा दिशा पाटणी हिला लॉकडाऊनच्या आधीपासूनच डेट करीत आहे दोघांचे मालदीव व्हेकेशन मधील हॉट फोटोज सोशल मीडियावर चांगलेच गाजले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी २ नंतर सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास बंदी असताना ही काल संध्याकाळी सहाच्या दरम्यान बांद्रा बँडस्टँड बस स्थानकाजवळ टायगर श्रॉफची गाडी चक्कर मारत होती त्यादरम्यान पोलिसांनी गाडी अडवून विचारणा केली असता कोणत्याही सबळ कारणाशिवाय ते फिरत असल्याचे निदर्शनास आल्याने टायगर श्रॉफ, दिशा पाटणी आणि त्यांच्या ड्रायव्हर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close