रोहा बाजारपेठेतील “विलास एजन्सी’ या लोकप्रिय किराणा दुकानाचे आज नूतनीकरण होऊन सुसज्ज असे सुपर मार्केट चे उदघाटन पालक मंत्री आदिती तटकरे यांचा हस्ते व अनिकेत तटकरे यांचा उपस्थितीत संपन्न…

[avatar]
रोहा बाजारपेठेतील “विलास एजन्सी’ या लोकप्रिय किराणा दुकानाचे आज नूतनीकरण होऊन सुसज्ज असे सुपर मार्केट चे उदघाटन पालक मंत्री आदिती तटकरे यांचा हस्ते व अनिकेत तटकरे यांचा उपस्थितीत संपन्न…
रोहा (संतोष सातपुते):रोहे बाजारपेठेतील सुप्रसिद्ध किराणा व्यवसायिक असलेल्या गुजर परिवाराच्या ‘विलास एजन्सी’ या लोकप्रिय दालनाचे आज नूतनीकरण होऊन सुसज्ज असे सुपर मार्केट ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज होत आहे.
गेली 100 वर्ष या परिवाराची नाळ ही रोहेकरांशी जुळलेली आहे. कै.रमेश गुजर उर्फ भाई यानी स्वकष्टाने व आपल्या मधाळ व म्रुदु स्वभावाने या व्यवसायाचा पाया भक्कम केला त्यांचे तिनही सुपुत्र व आता नातू देखील या भक्कम पायावर कळस उभारण्याचे काम करीत आहेत.
विलास एजन्सी म्हणजे रोहे बाजारपेठेतील एक लोकप्रिय दालन. हे दालन प्रत्येकाला आपलेसे वाटते कारण तिथे येणाऱ्या ग्राहकाला फक्त वस्तूंची विक्री होत नाही तर आस्थेने व आपुलकीने प्रत्येकाची चौकशी देखील केली जाते,वेळप्रसंगी अडीअडचणीला खिशात पैसे नसले तरी तिथे आपल्याला माल मिळेल अशी खात्री ग्राहकांच्या मनामध्ये नेहमीच असते.
कै. भाई म्हणजे चैतन्य,स्नेह व आपुलकीचा वाहता झरा होते त्यांचा वारसा त्यांचे तिन्ही सुपुत्र पूढे सक्षमपणे चालवत आहेत या गोष्टीचे विशेष समाधान आहे.
कै. भाई दुकानातील सर्व कारभार बघत असताना ग्राहकांना मिळणाऱ्या सौजन्यपूर्ण व आपुलकीयुक्त वागणुकीत तसूभरही फरक पडलेला नाही .
त्यांचे सुपुत्र श्री. विलासशेठ व श्री.प्रशांतशेठ दुकानात व श्री. महेंद्रशेठ सार्वजनिक जीवनात नेहमीच येणाऱ्या सगळ्यांशी प्रेमाने व आदबीने वार्तालाप करतात.
रोह्यातील अनेक घरांशी नाळ जुळलेले हे दालन आज आधुनिकतेची  नवीन कात टाकत आहे व एक दुग्धशर्करा योग म्हणजे जुन्या दालनाच्या नुतनीकरणाबरोबरच श्री. दर्शन महेंद्र गुजर यांच्या दर्शन एन्टरप्रायझेस या नवीन सेवा दालनाचाही शुभारंभ होत आहे.
या सुपर मार्केट चे उदघाटन आज पालक मंत्री आदिती तटकरे  व श्रीमती निर्मला रमेश गुजर यांचा हस्ते व आमदार अनिकेत तटकरे, नगराध्यक्ष श्री संतोष पोटफोडे व उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवक, विजयराव मोरे, अप्पा देशमुख आणि रोह्यातील प्रतिष्ठित व्यापारी, नागरिक यांच्या उपस्थितीत आज संपन्न झाला.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close